सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त भरलेल्या यात्रेत वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. वन परिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत वन विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. आठ जणांना दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. Eight arrested for selling wildlife parts in Ashadi Wari Solapur Pandharpur
जप्त करण्यात आलेल्या साहित्यात हात्ताजोडी – 45, वन्य प्राण्यांची नखे- 148, कस्तुरी मृग सदृष्य गोळे – 242, अस्वलाचे केस, हरणाचे कातडे – 1 (250 मिलीग्रॅम), वाघ सदृष्य वन्यप्राण्याचे अवयव – 28 व नखे – 20 यांचा समावेश आहे. काळी जादू, चेटूक, भानामती, भूत काढणे आदीसाठी अंधश्रद्धेतून याची विक्री केली जाते.
या प्रकरणात मिल्टर मलमलशा भोसले, जडबूख मवडर पवार, बगलेबाई अंकूश पवार, छायाबाई अंकूश पवार, पूजा सुरेश पवार, बादल शाम पवार, सुहाना नाफरिया पवार, मालाश्री नवनाथ पवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आठही आरोपींना दोन दिवसांची कोठडी सुणावण्यात आली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/581001826910884/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ उजनी अखेर मृतसाठ्याबाहेर, जलाशयातील आवक पाहता धरण वेगाने भरणार
पंढरपूर – यंदाच्या उन्हाळा हंगामात वजा 12.77 टक्के स्थितीत पोहोचलेले उजनी धरण मागील आठवड्यापासून दौंडमधून पाण्याची आवक वाढल्याने काल मंगळवारी (ता. 12) रात्रीपासून उपयुक्त पाणी पातळीत भरू लागले आहे. हे सोलापूरसाठी समाधानकारक बाब आहे.
भीमा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे दौंडची आवक 43 हजार 150 क्युसेक्स इतकी होती. मागील चार दिवसात धरण 12.77 टक्के वधारले आहे. मुळा – मुठा खोर्यातील खडकवासला प्रकल्प शंभर टक्के भरल्याने यातून 12 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढून पंचवीस हजार क्युसेक झाला आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात उजनी धरणाला होणार आहे. याचबरोबर कलमोडी धरण शंभर टक्के भरल्याने यातून सकाळी 4990 क्युसेक पाणी सोडले जात होते.
पुणे बंडगार्डनचा विसर्ग व दौंडची आवक तसेच भीमा खोर्यात होत असलेल्या पावसाची स्थिती पाहता पुढील काही दिवसात उजनी धरण झपाट्याने वधारेल असे दिसत आहे. 2021 मध्ये पावसाळा हंगामात 110 टक्के भरलेले धरण जून 2022 मध्ये वजा 12.77 टक्के अशा स्थितीत होते. मागील चोवीस तासात भीमा खोर्यातील अनेक धरणांवर मुसळधार पावसाची नोंद आहे. याच बरोबर तेथील प्रकल्पही वधारू लागले आहेत. उजनीला पाणी देवू शकणार्या धरणांंमध्येही आता पाणी साठू लागले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/580816030262797/