Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता, सोमवारपासून इंद्रायणी एक्सप्रेस धावणार

उजनी अखेर मृतसाठ्याबाहेर, आली उपयुक्त पातळीत

Surajya Digital by Surajya Digital
July 13, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूर प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता, सोमवारपासून इंद्रायणी एक्सप्रेस धावणार
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सोलापूरकर आणि पुणेकरांसाठी आनंदाची वार्ता आहे. सोलापूरकरांच्या हक्काची म्हणून ओळखली जाणारी सोलापूर – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस येत्या सोमवारपासून ( १८ जुलै) दररोज धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. Good news for Solapur passengers, Indrayani Express will run in Ujani Plus from Monday

 

सोलापूर रेल्वे स्थानकावरून १.२५ वाजता सुटणारी गाडी ६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. कोरोना काळात बंद करण्यात आलेली इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी विविध संस्था, रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी प्रशासनाकडे केली होती.

ही गाडी १८ जुलै २०२२ रोजी पुणे स्थानकावरून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पुढील स्थानक, दौंड आगमन १०.३३ प्रस्थान १०.३५, जेऊर आगमन ११.३४ प्रस्थान ११.३५, कुर्डुवाडी आगमन १२.०३ प्रस्थान १२.०५, सोलापूर ०१.२५ वाजता पोहोचणार आहे. तर सोलापूर-पुणे एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी २ वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन २.४७ प्रस्थान २.५०, जेऊर आगमन ३.१९ प्रस्थान ०३.२०, दौंड आगमन ०४.३८ प्रस्थान ०४.४०, पुणे ०६.०५ वाजता पुण्यात पोहोचणार आहे.

दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामामुळे गाडी बंद होती. इंद्रायणी एक्सप्रेस सुरू न करण्याचे कारण सांगितले जात होते. गाडी सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या मागणीचा रेटा वाढला होता. निवेदनेही देण्यात आली होती. या प्रवाशांच्या मागणीचा विचार करीत रेल्वे प्रशासनाने इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सोमवार १८ जुलैपासून ही गाडी नियमित धावणार आहे. या गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सोलापूरहून पुणे, मुंबईला दररोज जाणारे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक प्रवास करतात. त्यांना ही गाडी सोयीची ठरत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ उजनी धरण उपयुक्त पातळीत, उजनी अखेर मृतसाठ्याबाहेर

 

पंढरपूर – आज बुधवारी (ता. 13) सायंकाळी उजनी धरणात येणारी दौंडची आवक पन्नास हजार क्युसेक इतकी झाली होती. तर प्रकल्प उपयुक्त पातळीत 7.62 इतका भरले होते. भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून 13 हजार क्युसेक तर कलमोडीमधून 2668, कासारसाई योजनेतून 4600 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता बंडगार्डनचा विसर्ग 31 हजार क्युसेक इतका झाला होता. यामुळे उजनीला आगामी काळात याचा फायदा होणार आहे. भीमा खोर्‍यात मागील चोवीस तासात चांगला पाऊस झाला आहे. भीमा व मुळा मुठा उपखोर्‍यात मुसळधार पावसामुळे प्रकल्प झपाट्याने भरत आहेत. उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा 67.74 टीएमसी इतका असून यातील उपयुक्त पाणी हे 4.08 टीएमसी इतके होते.

यंदाच्या उन्हाळा हंगामात वजा 12.77 टक्के स्थितीत पोहोचलेले उजनी धरण मागील आठवड्यापासून दौंडमधून पाण्याची आवक वाढल्याने काल मंगळवारी (ता. 12) रात्रीपासून उपयुक्त पाणी पातळीत भरू लागले होती. हे सोलापूरसाठी समाधानकारक बाब आहे.

भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे दौंडची आवक 43 हजार 150 क्युसेक्स इतकी होती. मागील चार दिवसात धरण 12.77 टक्के वधारले आहे. मुळा – मुठा खोर्‍यातील खडकवासला प्रकल्प शंभर टक्के भरल्याने यातून 12 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढून पंचवीस हजार क्युसेक झाला आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात उजनी धरणाला होणार आहे. याचबरोबर कलमोडी धरण शंभर टक्के भरल्याने यातून सकाळी 4990 क्युसेक पाणी सोडले जात होते.

 

पुणे बंडगार्डनचा विसर्ग व दौंडची आवक तसेच भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसाची स्थिती पाहता पुढील काही दिवसात उजनी धरण झपाट्याने वधारेल असे दिसत आहे. 2021 मध्ये पावसाळा हंगामात 110 टक्के भरलेले धरण जून 2022 मध्ये वजा 12.77 टक्के अशा स्थितीत होते. मागील चोवीस तासात भीमा खोर्‍यातील अनेक धरणांवर मुसळधार पावसाची नोंद आहे. याच बरोबर तेथील प्रकल्पही वधारू लागले आहेत. उजनीला पाणी देवू शकणार्‍या धरणांंमध्येही आता पाणी साठू लागले आहे.

 

 

Tags: #Goodnews #Solapur #passengers #Indrayani #Express #run #Ujani #Plus #Monday#सोलापूर #प्रवासी #आनंद #वार्ता #सोमवार #इंद्रायणी #एक्सप्रेस #धावणार #उजनी #प्लस
Previous Post

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

Next Post

राज्य सरकार निर्णय : पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त, सरपंच व नगराध्यक्षांची निवडणूक होणार थेट जनतेतून

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राज्य सरकार निर्णय  : पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त, सरपंच व नगराध्यक्षांची निवडणूक होणार थेट जनतेतून

राज्य सरकार निर्णय : पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त, सरपंच व नगराध्यक्षांची निवडणूक होणार थेट जनतेतून

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697