Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

दुबईत समुद्राच्या लाटेत महाराष्ट्रातील मराठी कुटुंब बुडाले

In Dubai, a Marathi family from Maharashtra drowned in the waves of the Oman Sea

Surajya Digital by Surajya Digital
July 13, 2022
in Hot News, देश - विदेश, महाराष्ट्र
0
दुबईत समुद्राच्या लाटेत महाराष्ट्रातील मराठी कुटुंब बुडाले
0
SHARES
317
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

वृत्तसंस्था : दुबईतील ओमान समुद्राच्या लाटेत महाराष्ट्रातील एक कुटुंब गिळले आहे. हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. दुबईतील प्रशासनाने आठजण वाहून गेल्याचे म्हटले आहे. यातील काहीजणांची ओळख आणखी पटली नाही. In Dubai, a Marathi family from Maharashtra drowned in the waves of the Oman Sea

 

समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहून प्रत्येकजण हुरळून जातो. पण ही लाट जीवघेणे ठरायला वेळ लागत नाही. असंच काहीसं ओमानमध्ये घडलं आहे. काही लोक सुरक्षा कुंपण ओलांडून येथील अल मुघसेल बीचवर समुद्रात पोहोचले. यादरम्यान एक जोरदार लाट आली आणि काही लोकांना सोबत घेऊन जाऊ लागली. व्हिडिओमध्ये तेथे उपस्थित लोक काही लोकांना वाचवतानाही दिसत आहेत. पहा हा ट्वीट केलेला व्हिडिओ…

 

🔴 حادثة غرق العائلة الاسيوية في المغسيل بفعل قوة الأمواج إثر تخطيهم حاجز الأمان ! pic.twitter.com/rDZAETJuik

— طـقـس عُـمـان 🌦 (@WeatherOman) July 11, 2022

 

समुद्रात लाटांसोबत गेलेले लोक अजूनही बेपत्ता आहेत. ओमान पोलिसांनी सांगितले की, लोक लाटेत वाहून गेलेले लोक आशियाई कुटुंबातील होते. त्याच वेळी, काही लोक त्यांना भारतीय कुटुंब म्हणत आहेत. मात्र, लोकांची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. रॉयल ओमान पोलिसांनीही या प्रकरणासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. पोलिसांनी सांगितले- बेपत्ता आशियाई कुटुंबीयांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल मुगसेल परिसरातच या लोकांचा शोध सुरू आहे समुद्रात बुडालेल्या लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. रॉयल ओमान पोलिसांनी याबाबत ट्विट केले असून ऑपरेशनशी संबंधित काही फोटोही शेअर केले आहेत.

 

यात एक कुटुंबावर सांगलीच्या जत येथील आहे. शशिकांत म्हणाणे हे गेली 15-16 वर्ष दुबईत नोकरीसाठी स्थायिक झाले होते. एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर असलेले शशिकांत रविवारी आपली 9 वर्षाची मुलगी श्रुती, 6 वर्षांचा मुलगा श्रेयस यांना पत्नीसमवेत वर्षा सहलीला ओमानच्या समुद्रकिनारी घेऊन गेले.

सगळे आनंदात वर्षा सहलीचा आनंद घेत असताना एका क्षणी समुद्र खवळला आणि त्याला आलेल्या एका भरतीत शशिकांत आणि त्यांची 2 मुले वाहून गेली. त्यांच्या पत्नीच्या सारिकाच्या डोळ्यांदेखत त्यांचा संसार मोडकळीस आला. त्यांच्या पत्नीला अजूनही या धक्क्यातून सावरणे अवघड जात आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले असता हि दुर्घटना घडली. या घटनेने जतमध्ये शोककळा पसरली आहे.

 

वडील आणि दोन मुले ओमानच्या समुद्रात वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी (12 जुलै) घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू ॲड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते.

बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबईजवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. याबाबतचा एक व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावेळी ही घटना घडली आहे. मग ते ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले, तिथे प्रचंड लाटा होत्या. त्याचा व्हिडीओ शूट करतानाच मोठी लाट आली आणि त्यात काही जण ओढले गेले.

 

या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे समुद्रात बेपत्ता झाले. तर त्यांच्या पत्नी सारिका आणि एका मुलीची सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शशिकांत म्हमाणे यांचे बंधू तात्काळ दुबईला गेल्याची कुटुंबीयांनी सांगितलं. परंतु आनंद लुटण्यासाठी म्हणून समुद्रकिनारी गेलेल्या या कुटुंबावर काळाने घात केला. या घटनेमुळे कुटुंबावर आणि मूळ गाव जतमध्ये शोककळा पसरली आहे.

 

Tags: #Dubai #Marathi #family #Maharashtra #drowned #waves #OmanSea #sangali #jat#दुबई #ओमान #समुद्र #लाटेत #महाराष्ट्र #सांगली #जत #मराठी #कुटुंब #बुडाले
Previous Post

जेव्हा – जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवारांचा हात, राज ठाकरेंच्या पाठिशीही पवारांचे आशीर्वाद

Next Post

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697