सोलापूर / अजित उंब्रजकर
नुकत्याच झालेल्या भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्षांच्या कथित प्रकरणामुळे भाजपावर नामुष्कीची वेळ आली असली तरी आता मात्र भाजपाला ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.त्यामुळे भविष्य काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मिशन लोटस पूर्ण करण्यासाठी सक्षम जिल्हाध्यक्षांची नेमणूक करावी लागणार आहे. For BJP’s ‘Mission Lotus’ in Solapur, capable and characterful District President Mohite Patil
सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर भाजपाचा वरचष्मा दिसत असला तरी काही भागात अद्यापही भाजपा कुमकवत दिसत आहे. आठ आमदार आणि दोन खासदार असले तरी दमदार जिल्हाध्यक्ष मिळाला नसल्याने जिल्ह्याच्या काही भागात भाजपाला संघटनात्मक बांधणीची गरज भासू लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ अशा दोन मतदारसंघांना व त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांना एकसंघ आणणारा चेहरा भाजपाला आता शोधावा लागणार आहे.
भाजपामध्ये नेत्यांची खूप मोठी फळी आहे मात्र संघटनात्मक बांधणी पातळीवर किमया साधणारा नेता निवडावा लागणार आहे.त्यामध्ये माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या फलटण व माण तालुक्याशी संपर्क असणे देखील गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपा भक्कम वाटत असली तरी संघटन पातळीवर मागील काही वर्षात म्हणावे तसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. सोलापूर जिल्हा फादर बॉडी मधील अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस कोषाध्यक्ष या निवडी झालेल्या आहेत तर ३० महिला व ६ एसटी एससी सदस्य सहित एकूण ९० कार्यकारणी सदस्यांच्या नेमणूका अद्यापही झालेल्या दिसत नाहीत.
किसान मोर्चा महिला मोर्चा आदिवासी मोर्चा यांच्या फक्त अध्यक्ष निवडी झालेल्या आहेत पण यामधील इतर सर्व पदे रिक्त आहेत. ओबीसी व अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकारणीतील सर्व पदांच्या निवडी रखडलेल्या आहेत. सोशल मीडिया सेल, व्यापारी आघाडी, भटके विमुक्त आघाडी ,माजी सैनिक आघाडी, अध्यात्मिक समन्वय आघाडी, सहकार आघाडी या सहा प्रकोष्ठांच्या फक्त संयोजक निवडी झालेल्या आहेत इतर पदे अद्यापही रिक्त आहेत तर कामगार आघाडी, वैद्यकीय आघाडी, उत्तर भारतीय आघाडी, दक्षिण भारतीय आघाडी ,कायदा सेल, प्रज्ञा सेल, उद्योग सेल, ट्रान्सपोर्ट सेल, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल,दिव्यांग सेल ,सांस्कृतिक सेल, मच्छीमार सेल, शिक्षक आघाडी या प्रकोष्ठांच्या कार्यकारणीतील एकही पद भरले गेलेले नाही त्यामुळे भाजपाला पुनर्बांधणीची गरज वाटू लागली आहे यासाठी सर्वच पातळीवर दमदार असा नेता, काम करणारा, वेळ देणारा नेता जिल्हाध्यक्षपदी निवडावा लागणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/585001136510953/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/584880833189650/
खासदार,आमदार, जिल्हा परिषद सदस्य हे विकासाभिमुख कार्य करत असताना त्यांना संघटन बांधणी करणाऱ्या जिल्हाध्यक्षाची ताकद द्यावी लागणार आहे.सडेतोड पक्षाची भूमिका मांडणारा निष्कलंकित व पारदर्शी चेहरा यासाठी भाजपाला शोधावा लागणार आहे. कमकुवत भागात आपल्या संघटन बांधणीच्या जोरावर भाजपाला पुढे घेऊन जाणारा, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारा नेता जिल्हाध्यक्ष म्हणून नेमावा लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्याची प्रभारी पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे आणि सध्या घडत असलेल्या अनपेक्षित घडामोडीमुळे भाजपाला खाली पाहण्याची वेळ आली आहे त्यामुळे निष्कलंकित व सोलापूर जिल्ह्यावर प्रभाव टाकणाऱ्या नेतृत्वाला निवडावे लागणार आहे.
● मोहिते – पाटलांना संधी मिळाली तर…
संघटन महामंत्री म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी अल्पावधीत आपल्या कार्याची चुणूक दाखवत भाजपाची माळशिरस तालुक्यामध्ये जी संघटनात्मक ताकद निर्माण केली आहे ती भाजपासाठी प्रेरणादायी ठरू शकते. सामाजिक कार्यात अग्रेसिव्ह असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना त्यांनी पदे देऊन प्रोत्साहित केले असून यामुळे माळशिरस भाजपा भक्कम स्थितीत वाटत आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्हाभर निर्माण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशीही चर्चा भाजपा प्रेमी मधून होताना दिसत आहे. प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील काही निवडणुकात त्यांनी अचूक कामगिरी करत भाजपाला यश संपादन करून दिल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
सोलापूर भाजपा एक संघ आणि बलशाली करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. संघटनात्मक बांधणीचा अनुभव त्यांचा दांडगा असल्याने त्यांच्या नेतृत्वाला भाजपा बळ देईल व आगामी निवडणुकांना सामोरे जाताना मिशन लोटस चा प्रयोग करतील असाही विश्वास व्यक्त होताना दिसत आहे. एकूणच धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली गेली तर त्यांच्यात असणाऱ्या अचूक नियोजन व संघटनात्मक बांधणीच्या गुणामुळे ते भाजपाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील यात शंका नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/584879636523103/