नवी दिल्ली : भारताची आघाडीची आणि जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पि.व्ही. सिंधू हिने बर्गिमहॅम येथील 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. सिंधूने महिला एकेरीत कॅनडाच्या मिशेल ली हिचा सरळसेट मध्ये दणदणीत पराभव केला. सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत हाँगकाँगमध्ये जन्मलेली कॅनडाची शटलर मिशेल ली हिचा 21-15, 21-13 असा पराभव केला. Commonwealth Games: PV Sindhu’s golden performance, India bag 19 gold medals
सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे पहिलेवहिले गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तिच्या या सुवर्ण यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी सिंधूने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य, 2018 साली रौप्य प्राप्त केले होते. मात्र, यावेळी तिने थेट सुवर्णपदक खेचून आणले आहे. महत्वाचे म्हणजे सिंधूच्या सुवर्णपदकासह राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये आतापर्यंत भारताच्या गोल्ड मेडलची संख्या 19 झाली आहे. जवळपास भारताची पदकसंख्या 56च्यावर गेली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक (गोल्डमेडल) आहे. यामध्ये 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात सिंधूचे एकेरीतील हे पहिले सुवर्णपदक आहे. मिशेल ली ही तीच खेळाडू आहे जिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत सिंधूने त्या पराभवाचा बदलाही मिशेल लीकडून घेतला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/598392055171861/
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पीव्ही सिंधूचे एकूण पाचवे पदक. तिने गोल्ड कोस्ट 2018 मध्ये मिश्र संघासह सुवर्णपदक आणि महिला एकेरीत रौप्य पदक जिंकले. यापूर्वी ग्लासगो 2014 गेम्समध्ये तिने मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य आणि महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. यापूर्वी पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया मिनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने जिया मिनचा 21-19, 21-17 असा पराभव केला. 27 वर्षीय सिंधूने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.
सिंधूच्या विजयाने भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे. सिंगापूर आणि मलेशियन बॅडमिंटनपटूंना पराभूत करून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिचे जिंकणे जवळपास निश्चित झाले होते. दोघींमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पहायला मिळाला.
2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. 2018 मध्ये सिंधूला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर 2014मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू या 19 खेळाडूंनी गोल्डमेडल पटकावले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598306835180383/