मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. परंतु अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. अशातच आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (मंगळवारी) 11 वाजता होणार आहे. दोन्ही गटाचे मिळून 18 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. एकूण 20 जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे. decided; Cabinet expansion to be held tomorrow, Shinde government’s ‘these’ leaders received a call
शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा उद्या (मंगळवार) विस्तार होणार आहे. त्यामुळे कोणत्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता भाजपच्या गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांना निरोप देण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आला असल्याचं समजतं.
मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टपूर्वी होईल. शिवाय, पुढील काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल. गृहखातं भाजपकडेच राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन 35 दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती दिली. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे आणि त्यासाठी याधीच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा फडणवीस आणि शिंदे यांचा प्रयत्न आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/598160338528366/
मंत्रिमंडळाचा विस्ताराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मी त्याही पुढे जाऊन सांगतो, सर्वांनी विचारण्याआधीच आमच्या सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. सर्वोच्च न्यायालयाने कुठेही मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे कुठेही म्हटले नाही. त्यामुळे सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत.’
उद्या कोण कोणते मंत्री शपथ घेणार याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, यामध्ये 6 ते 7 मंत्री शिंदे गटाचे असू शकतात. 10 ऑगस्टपासून राज्यात पावसाळी अधिवेशन होणार आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. विधिमंडळ सचिवांनी देखील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनासंदर्भात ही बैठक बोलावलण्यात आल्याचे माहिती आहे.
ज्या आमदार, नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा नेत्यांना फोन करण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीने बोलावण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी उद्या सकाळी बैठक होणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
मंत्रिमंडळ विस्तारात 14 जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यात राज्यातील प्रत्येक विभागातून एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. ज्या आमदार नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, त्यांना फोन गेल्याची माहिती मिळाली आहे. या आमदारांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सकाळी ९ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे, अशी माहिती मिळतेय. संभावित नावांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटातून गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्या नावांची चर्चा आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/597789858565414/