अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा काढावी लागली आहे. Mind-blowing incident: Villagers carry funeral procession through flood waters in Akkalkot due to lack of bridge
अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील हे विदारक दृश्य आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. मात्र राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. या नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
हरणा नदीवर पितापूर येथे, तर बोरी नदीवर सुलतानपूरनजीक मोठा पुल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे. अलीकडच्या काळात पाऊस मुबलक होत असल्याने वारंवार पुरपरिस्थिती निर्माण होत आहे. म्हणून याठिकाणी पुलाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तुळजापूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे हरणा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे जात असून सोमवारी पितापूर-अकतनाळचा संपर्क तुटला आहे. दरम्यान यामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. अशा पूर परिस्थितीतच आज सकाळी सुलतानपूर गावात नूर अहमद नावाच्या एका वयोवृद्ध इसमाचा मृत्य झाला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/599153248429075/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/599033718441028/
पुरामुळे सर्वच मार्ग बंद झाल्याने आणि दफनविधीची जागा नदीच्या पलीकडे असल्याने अंत्यविधी करण्याचा मोठा प्रश्न गावक-यासमोर उभा होता. तेव्हा गावातील तरुण वर्ग पुढाकार घेऊन धाडस करुन हरणा नदीला पूर आले असताना ही जीव धोक्यात घालून अशा पुराच्या पाण्यातूनच कैलास रथ पलीकडे नेऊन त्या नूर अहमद वयोवृद्ध इसमाच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या चित्तथरारक आणि दुःखद घटना पाहून अंत्ययात्रेत जमलेल्या सर्व नागरिकांचे मन सुन्न झाले होते.
एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अजून असे कित्येक गावातील गावकऱ्यांची परिस्थिती दयनीय असल्याचे पहायला मिळत आहे. आज ही अनेक गावात व वाडीवस्त्यावर राहणारे नागरिक हे अनेक सोयीसुविधा पासून वंचित असल्याचे पहायला मिळत आहे.
सद्यस्थितीत पितापूर या ठिकाणी पर्यायी पुल नसल्याने स्थानिक बहुसंख्य नागरिक नदीच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. याठिकाणी पुलाचा प्रश्न, आणि पितापुर गावचा पुनर्वसनाचा प्रश्न हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पितापूर येथील वयोवृद्ध नूर अहमद यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या चित्तथरारक अंत्यविधी मुळे आता पुन्हा एकदा पितापूर येथील पुलाचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील सुलतानपूर – किणी मार्गावरील बोरी नदीचा प्रवाह देखील धोकादायक बनत चालला आहे. नळदुर्ग येथील नर मादी प्रवाहित झाल्याने बोरी नदीची पातळी वाढली असून रविवारी रात्री सुलतानपूरजवळील या नदीवरील पुल ७० टक्के वाहून गेल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वपूर्ण रस्ता असल्याने या मार्गावरील वाहनधारक हे जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598843748460025/