मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्षपद बदलणार असल्याची चर्चा आहे. कारण सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर आशिष शेलार हे भाजपचे नविन प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून मुंबईतील बांद्रा या विधानसभा क्षेत्रातून निवडून येतात.Will BJP state president change? This will be the new president, now waiting for account sharing
चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे रिक्त झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कुणावर सोपवली जाणार यावर चर्चा सुरू आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदावर असताना चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा एक आक्रमक चेहरा म्हणून काम पाहिले. महाविकास आघाडीविरोधात पक्षाची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात मांडण्यात ते अग्रेसर होते. तसेच ओबीसी आरक्षणासारख्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकार विरोधातील आंदोलनातही त्यांनी उत्तम नेतृत्व केले. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे.
ही जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चंद्रकांत पाटील यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत आल्यानंतरच भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या नावांची चर्चा सुरु होती. कालपर्यंत या पदासाठी आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव समोर येतंय.
आशिष शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळेच त्याचं नाव आता मागे पडले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील या दोन पदाधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/599033718441028/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे मुंबईतील भाजप अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे भाजप पक्षश्रेष्ठींकडून हे पद देण्यात येऊ शकते. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी झाली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पेटून उठण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. प्रत्येक ठिकाणच्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. याचा फायदा भाजपा होऊ शकतो, असे म्हटले जातेय. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका जिंकण्याची संधी असल्याने भाजपसाठी हे मोठं मिशन ठरणार आहे. त्यामुळेच शेलारांसारख्या अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
मागील 39 दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, याची प्रतीक्षा होती. आज अखेर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असून लवकरच या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होईल. महाविकास आघाडीतील अनेक आमदार तसेच मंत्र्यांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात थेट नाराजी बोलून दाखवली होती. मंत्रिपद न मिळाल्यानेही अनेकजण नाराज होते. आता शिंदे सरकारतर्फे कुणाला-कोणतं खातं मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुणाला कुठलं खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात नव्या मंत्र्यांनी मिळणारी संभाव्य खात्यांचे नाव समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यात गृह आणि अर्थ खाते हे फडणवीसांकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे. आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
□ आमदार बच्चू कडू यांची नाराजी
भाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये अपक्ष, मित्रपक्षांनीही साथ दिली. मात्र पहिल्या विस्तारात अपक्षांना संधी देण्यात आली नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. दिव्यांग कल्याण मंत्रालय, रोजगार हमी विभाग यासाठी आम्ही आग्रही आहोत. मंत्रिपदाचा आमचा हक्क, अधिकार आहे ते आम्ही मिळवू. सामान्य माणसांचे विषय मार्गी लागावेत याला प्राधान्य आहे. मित्रपक्ष, अपक्षांशिवाय सरकार राहू शकत नाही. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. आम्हाला शब्द दिला आहे. आता काही पावलं मागे घेतली आहे. शब्दाला ठाम राहावं अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598877058456694/
□ संभाव्य खातेवाटप
– एकनाथ शिंदे – नगरविकास खाते
– देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ
– राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, सहकार खाते
– चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
– गिरीश महाजन – जलसंपदा खाते
– सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वने खाते
– विजयकुमार गावित – आदिवासी विकास खाते
– उदय सामंत – उद्योग खाते
– अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
– दीपक केसरकर – पर्यटन, पर्यावरण
– रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
– सुरेश खाडे – सामाजिक न्याय विभाग
– मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय विभाग
– गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – कृषी खाते
– अतुल सावे – आरोग्य खाते
– तानाजी सावंत – उच्च व तंत्र शिक्षण खाते
https://www.facebook.com/109399567404448/posts/598843748460025/