□ कोरवलीतील हृदय द्रावक घटना, परस्परावर गुन्हा दाखल
विरवडे बु : कोरवली (ता.मोहोळ ) येथे तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची मन हेलावून सोडणारी घटना सोमवारी (ता.8 रोजी) सायंकाळी सहाच्या दरम्यान कोरवली येथे घडली आहे. Solapur: Solapur committed suicide by hanging mother along with three year old Lekki
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे (वय. 25 ) तर आरोही विजयकुमार माळगोंडे (वय 3 वर्ष ) असे मयत माय लेकींचं नाव आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रीतीचे पाच वर्षांपूर्वी कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती व विजयकुमार हे दापत्य त्यांच्या शेतातील घरात राहत होते. त्यांना मुलगी आरोही (मयत) व मुलगा बसवराज असे दोन मुले होती.
त्यांचा सुखाचा संसार चाललेला असताना दीड वर्षापासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ करीत होता. दरम्यान या दांपत्याने सोमवारी (ता. 8) सकाळी दहा वाजता गावातील महादेव मंदिरात येऊन अभिषेक घालून गेले होते. सोमवारी दुपारी तू मल्लिनाथ (रा. हत्तुर ता. दक्षिण सोलापूर) मयताचा भाऊ याला का फोन केला म्हणून तिला चाबकाने व चपलाने मारहाण करून धमकी दिली होती. धमकी देऊन तो जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598845775126489/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तिने सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही (वय 3 वर्ष) व मुलगा बसवराज (वय दीड वर्ष) यांना राहते घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने मुलगा बसवराज याचा जीव वाचला आहे.
मयताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे (रा. हत्तुर ता. दक्षिण सोलापूर) यांनी मयताचा पती विजयकुमार हा माझे बहिणीस सतत शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. अशा प्रकारची फिर्याद विजयकुमार माळगोंडे यांच्यावर दाखल केली आहे. तर मयताचे पतीने विजयकुमार माळगोंडे यांनी माझी मुलगी आरोही हीला गळफास लावून तिला जीवे मारून स्वतःही साडीने गळफास घेऊन पत्नी मयत झाली आहे. म्हणून मयत पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
अशा परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनेची माहिती कळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामती पारित प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवले. परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्याने मयत मायलेकीच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.
मयत मायलेकीला एकाच चितेवरती अंत्यसंस्कार देण्यात आले. या हृदय द्रावक घटनेने सर्व नातेवाईक व कोरवलीतील नागरिक हळहळ व्यक्त करत होते. अंत्यसंस्कारानंतर लगेचच मयताचे पती विजयकुमार माळगोंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. असून पुढील तपास कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598813441796389/