मुंबई : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊनही 39 दिवस उलटून मंत्रिमंडळाचा पत्ता नव्हता. अखेर राज्याला आता कारभारी मिळाले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. ‘पुरुषप्रधान मंत्रिमंडळ’ असा उल्लेख शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा उल्लेख केला जात आहे. The kingdom finally got a steward; Male dominated cabinet, no place for women Shinde Fadnavis
शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.
जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 18 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598830175128049/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओक्केच… या डायलॉगमुळे शहाजी बापू प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर जाताना शहाजी बापूंना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आमदारांना गुवाहाटीची आठवण करून दिली.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना मंत्रिपदे देतायत, हे चांगले आहे. गुवाहाटीला जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा शब्द त्यांना आम्ही सर्व आमदारांनी दिला होता. तसे अधिकार त्यांना दिले होते. यामुळे मंत्रिपद वाटपाचा अधिकारही त्यांना आहे. शिंदे जो निर्णय घेतील, ज्याला मंत्रिपद देतील ते आम्हाला मान्य असल्याचे शहाजी बापू पाटलांनी सांगितले.
शिंदे गटातून काही नावे ठरत नसल्याने सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे समर्थक आमदारांची बैठक झाली. असे असताना अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्रिपद घेणारच असे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय हे सरकार राहू शकत नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार, येत्या काळात आपण गरीब, दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणार, त्यामुळे आपल्याला मंत्रीपद भेटेल असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मात्र आतापर्यंत बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा नसल्याने त्यांना या मंत्रीमंडळ विस्तारातून डच्चू दिला असल्याची माहिती आहे.
भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.
या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598785011799232/
□ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नुतन मंत्री :
– शिंदे गटातील मंत्री
गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)
– भाजपमधील मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)
https://www.facebook.com/109399567404448/posts/598459475165119/