मुंबई : मुंबई मराठी सिनेसृष्टीला आज धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ‘मोरूची मावशी’ हे त्यांचे नाटक प्रचंड गाजले होते. त्यांनी अनेक नाटकात आणि सिनेमात भूमिका केल्या आहेत. नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. Famous Marathi actor Pradeep Patwardhan passed away Film actor
मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. आज मंगळवारी आज (9 ऑगस्ट) पटवर्धन यांचे हृदयविकाराने राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) निधन झाले.
मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यामधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598459475165119/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रदीप यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास सांगायचा झाल्यास पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल तो मोरुची मावशीचा. त्यानंतर त्यांनी नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जे प्रेक्षकांना प्रचंड भावले. कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत त्यांनी काम केले. पुढे ते व्यावसायिक नाटकाकडे गेले. मराठी रंगभूमीवरील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.
प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोला बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016)’एक फुल चार हाप’, ‘डान्स पार्टी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘एक शोध’, ‘चष्मे बहाद्दर’, ‘गोळा बोरीज’, ‘जर्नी प्रेमाची’, ‘थँक यू विठ्ठला’ यांसारख्या अनेक या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/598392055171861/