Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सिंहगडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा

Students of Sinhagad celebrated Raksha Bandhan by tying rakhyas to the police solapur

Surajya Digital by Surajya Digital
August 10, 2022
in Hot News, सोलापूर
0
सिंहगडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगांव येथील विद्यार्थिनींनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना व पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह पाटील यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. Students of Sinhagad celebrated Raksha Bandhan by tying rakhyas to the police solapur

 

तसेच शाळेत ही यावेळी मुलीनी स्वत: बनविलेल्या राख्या मुलांना बांधल्या. यामध्ये के.जी. ते बारावी पर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला. राख्या बांधल्यानंतर मुलांनीही ओवाळणी म्हणून बहिणीला चॉकलेट दिले. अशा खेळी- मेळीच्या वातावरणात हा सण साजरा झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुझेन थॉमस,उपप्राचार्य प्रकाश नवले, मुख्याध्यापिका चेताली मराठे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मागर्दर्शन केले. या उपक्रमाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी कौतुक केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

■ वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण

○ जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा : श्री काशी जगद्गुरू

पुणे : धर्मात अनेक व्रत आहेत. त्यापैकी सत्य हे एक व्रतच आहे. परमेश्वराने आपल्याला वाणी सत्य बोलण्यासाठीच दिली आहे. धर्माचरणाचे जे मार्ग आहेत त्यापैकी सत्य हा देखील एक मार्ग आहे. जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा आहे. सत्य बोलल्यामुळे पूज्यता येते. सत्यम् शिवम् सुंदरम् असे त्यासाठीच म्हटले आहे. असत्य बोलून केलेली पूजा, दान, ध्यानधारणा फळास येत नाही. असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

 

श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसीतर्फे वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वचनपर ते बोलत होते. याप्रसंगी ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य, औंधकर महाराज, खंडूशेठ चिंचवडे, विकास साने उपस्थित होते.

 

यावेळी प्रबोध परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक माधुरी पाटील (सोलापूर), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक शुभांगी अरळीमार (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक विभागून चिन्मयी सोपल (बार्शी), शिवकन्या मल्लिकार्जुन दळवे (बार्शी) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

तसेच प्रविण परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक महात्मा हत्ते (परळी वैजनाथ), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक सुभद्रा संकद (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक नूतन जंगम (मुंबई) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

महास्वामीजी पुढे म्हणाले की, ‘सा विद्या, या विमुक्तये’ म्हणजे विदयेमुळे संसारातून व्यक्ती मुक्त होतो. सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये अध्यात्मिक विद्या सर्वश्रेष्ठ आहे. त्याकरिता श्री काशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठाची स्थापना केली. आतापर्यंत सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून वीरशैव सिद्धांतांचा अभ्यास केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संगीता जोशी व किशोर जोशी (भाळभोर) यांचा महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बलसुरे यांनी केले. सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी तर गुरुशांत रामपूरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चेतना गौरशेटे, राजशेखर बुरकुले, महेश स्वामी, रोहिणी स्वामी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Tags: #Students #Sinhagad #celebrated #RakshaBandhan #bytying #rakhyas #police #solapur#सोलापूर #सिंहगड #विद्यार्थिनी #पोलिस #राख्या #बांधून #रक्षाबंधन #सण #साजरा
Previous Post

जयंती, सण, उत्सव, निवडणूक पाहता तिघांना सोलापूर शहर – जिल्ह्यातून केले तडीपार

Next Post

सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज

सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697