□ महापालिका 13 लाख खर्चून 100 फूट उंचीवर ‘तिरंगा ध्वज’ कायमस्वरूपी फडकवणार
सोलापूर : आजादी का अमृतमहोत्सव या मोहिमे अंतर्गत महापालिका आवारात कायमस्वरूपी १०० फूट उंचीचा तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. १३ ऑगस्टपासून तेथे ध्वज फडकणार आहे. Solapur: The tricolor flag will be hoisted permanently at a height of one hundred feet
सोलापूर महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. 13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे. पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगत तिरंगा ध्वज डौलाने फडकविलेल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले. 13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महापालिका आवारात “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ आणि त्यामागे इंद्रभुवनची सुंदर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे. महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वीतेसाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची जंगी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर एक आगळावेगळा उत्सव व्हावा या उद्देशातून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात येणार आहे.
शंभर फुटी ध्वजस्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने बनविलेला हा भव्य असा पांढऱ्या रंगाचा लोखंडी स्तंभ आहे. यामध्ये असलेल्या विद्युत मोटारच्या साह्याने ऑटोमॅटिकली ध्वजवर खाली करण्याची सोय उपलब्ध आहे. बाजूला 2 फोकसच्या प्रकाशात परिसर उजळणार आहे.
¤ तिरंगा ध्वज १०० फूट उंचीवर फडकणार
■ ध्वज विद्युत मोटारीने वर चढवणार
■ ध्वजावर लाल दिवे असणार आहेत. कारण आकाशातील वाहतुकीस ते गरजेचे असते
■ २० बाय ३० फूट आकाराचा ध्वज असणार खर्च १३ लाख रुपये.
》 तौफिक शेखसह एमआयएमचे सहा माजी नगरसेवक उद्या राष्ट्रवादीत जाणार
सोलापूर : एमआयएमपासून दुखावलेले नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह सहाजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले आहे. उद्या शुक्रवारी ( दि. १२ ) सायंकाळी पाच वाजता हेरिटेज गार्डनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
एमआयएमसह शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. प्रवेशाचा मुहूर्त मिळता मिळत नव्हता. महाविकास आघाडीची सत्ता प्रवेश ठरला. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासह सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले. तौफिक शेख, साजिया शेख, तस्नीम शेख, वाहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड यांचा समावेश आहे, अशी माहिती माजी महाविकास आघाडीची सत्ता नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली.