□ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आयुक्त शिवशंकर यांची शहरवासीयांना खुशखबर !
सोलापूर : भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. यामुळे 5 एमएलडी पाणी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे सोलापूर शहराला जिथे तीन दिवसाआड असेल तिथे दोन दिवसाआड याप्रमाणे एक दिवस अगोदर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिली. From the end of August, water will be supplied to the city one day earlier! Solapur Municipal Corporation
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर महापालिका आयुक्त शिवशंकर यांची शहरवासीयांना खुशखबर दिली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी भवानी पेठ जलशुद्धी केंद्राला भेट दिली. येथील फिल्टर बेड दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, यासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येथील फिल्टर बेड दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. यामुळे 5 एमएलडी पाणी क्षमता वाढणार आहे. सध्या या केंद्रात 15 एमएलडी पाणी घेतले जाते. अधिक या दुरुस्तीमुळे 5 एमएलडी पाणी क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर एचएसआर कामाची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. ते काम ही पूर्ण करण्यात येईल.
यामुळे पाणी क्षमतेत सकारात्मक फरक पडणार आहे. परिणामी येत्या ऑगस्ट अखेर पासून सोलापूर शहराला एक दिवस अगोदर पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. ज्या ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
□ सरासरी 5 टक्के कर वाढणार !
महापालिकेची नवीन कर आकारणी आता बिल्टअप एरिया प्रमाणे होणार आहे. महापालिकेची नवीन कर आकारणी आता बिल्टअप एरिया प्रमाणे करण्यात येणार आहे. त्यानुसार सरासरी पाच टक्के कर वाढणार आहे. पहिला टप्पा या महिन्यात हाती घेणार घेण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी दिली.
कायद्याप्रमाणे बिल्टअप एरियानुसार कर आकारणी आवश्यक आहे. 2010 मध्ये झालेले डिप्रीसीएशन चुकीचे आहे. सुधारणा झाली पाहिजे. रिविजन झाल्यानंतर पाच टक्के टॅक्स वाढणार आहे. नवीन कर आकारणी आता बिल्टअप एरिया प्रमाणे होणार आहे. अगोदर रिविजन होणार असून त्यानंतर पुरवणी बिल पाठविण्यात येणार आहे. जर अगोदर बिल भरला असेल तर फरक काढून तो जमा केला जाईल. पहिला टप्पा या महिन्यात हाती घेण्यात येणार आहे असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.