□ वीरचा विसर्गही वाढला , नीरा-भीमाकाठी सतर्कतेचा इशारा
पंढरपूर – उजनीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरण 97.35 टक्के भरले असून यातून आता धरणाचे आठ दरवाजे उघडून नदीपात्रात पाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. Starting to release water into the river from Ujani; Eight doors opened
उजनीला पाणी देवू शकणार्या घोड, चासकमान, खडकवासला यासह अन्य काही धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग सायंकाळी 19 हजार क्युसेकचा इतका होता. तर दौंडची आवक 36 हजार 500 क्युसेक झाली होती.
आज गुरूवारी सकाळपासून उजनी धरण झपाट्याने वधारले असून सायंकाळी ते उपयुक्त पातळीत 78 टक्के भरले होते. धरणात 115.81 टीएमसी एकूण पाणीसाठा असून यात उपयुक्त पाणी 52.16 टीएमसी इतके होते. दरम्यान धरणातून कॅनॉल 1500 क्युसेक तर सीना भीमा जोडकालव्यात 800 यासह दहिगाव प्रकल्पात 43 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भीमा खोर्यात होत असलेला पाऊस तसेच पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान पाहता धरण 98 टक्के होताच धरणाचे आठ दरवाजे उघडून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक व पाऊस पाहून यात वाढ केली जावू शकते. यासाठी भीमाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
□ वीरचा विसर्ग वाढविला
दरम्यान नीरा नदीवरील वीर धरण भरल्याने यातून सोडण्यात येणारे पाणी गुरूवारी सायंकाळी 32 हजार 500 क्युसेक इतके वाढविल्याने नीरा व भीमाकाठी आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नीरा खोर्यातही पावसाचा जोर असून तेथील चार ही धरण 92 टक्के भरल्याने वीर मधून सोडण्यात येणार्या पाण्यात सायंकाळी सहा वाजता वाढ करून तो 32 हजार 500 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
तत्पूर्वी 24 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. वीरच्या पाण्यामुळे नीरा व भीमा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. यातच आता उजनीतूनही पाणी सोडण्यात आल्याने संगमच्या पुढे भीमेची पाणी पातळी वधारणार आहे.
तौफिक शेखसह एमआयएमचे सहा माजी नगरसेवक उद्या राष्ट्रवादीत जाणार
सोलापूर : एमआयएमपासून दुखावलेले नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह सहाजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले आहे. उद्या शुक्रवारी ( दि. १२ ) सायंकाळी पाच वाजता हेरिटेज गार्डनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना एमआयएमसह शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. प्रवेशाचा मुहूर्त मिळता मिळत नव्हता. महाविकास आघाडीची सत्ता प्रवेश ठरला. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासह सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले. तौफिक शेख, साजिया शेख, तस्नीम शेख, वाहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड यांचा समावेश आहे, अशी माहिती माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली.