मुंबई : रिलायन्स उद्योग समुहामुळं जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणाऱ्या अंबानी कुटुंबाला धोका असल्याची बाब समोर आली आहे. अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे काही फोन आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आल्याचं समजत आहे. Ambani family threatened to end in next three hours, one arrested Reliance Foundation
मुकेश अंबानी व त्यांच्या परिवाराला धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला बोरिवलीतून ताब्यात घेतले आहे. या माथेफिरूने 7 ते 8 वेळा फोन करुन धमकी दिल्याची माहिती आहे. पण फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अफजल सांगितलं आहे.
ॲटिलिया प्रकरणानंतर प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. एका कारमध्ये जिलेटिनचा साठा सापडला होता.
मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे.
याविषयी अधिक माहिती देताना रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी म्हणाले की, आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. दहिसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित आरोपी 57 वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात याआधीदेखील आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ सलमानने फडकविला पाकिस्तानी झेंडा
नवी दिल्ली : भारतात सगळीकडे स्वातंत्रदिन साजरा होतोय. ‘हर घर तिरंगा’ सारख्या उपक्रमांमध्ये सर्व भारतीय सहभागी होताय. देशप्रेमाची भावना प्रत्येक नागरिकात बघायला मिळते आहे. अशात सलमानने पाकिस्तानी ध्वज फडकावून समाजातील शांतता बिघडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
सलमानवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस ताब्यात घेण्यासाठी गेली असता तो पळून गेल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश मध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यामुळे पोलिसांना डोकेदुखी झाली आहे. गावातील लोकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी झेंडा उतरवून घेतला होता. मात्र सलमानने हा झेंडा फडकविला तो फरार झाला असून, त्याचा शोध चालू आहे.
यूपीतील कुशीनगर मध्ये सलमान या 21 वर्षीय युवकाने स्वतःच्या घरावर पाकिस्तानी झेंडा फडकविला. त्याच्या आत्याने घरीच झेंडा शिवला असून, फक्त घर चांगले दिसावे असा त्यामागील तिचा उद्देश असल्याचे तिने सांगितले.
कुशीनगर येथील बेंदुपार मुस्तकील गावातील युवकाने आपल्या घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा फडकवला. युवकाला अनेकांनी विरोध केला मात्र, विरोध झुगारून घरावर पाकिस्तानी झेंडा फडकवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत घटनास्थळी जात युवकाला ताब्यात घेतले व झेंडा खाली उतरवला आहे.
युवकाला त्याच्या घरच्यांनी देखील विरोध केला होता, मात्र या विरोधाला न जुमानता त्याने पाकिस्तानी झेंडा फडकवला. व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या युवकाचे नाव सलमान असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.
एवढेच नाही तर पोलिसांनी रात्रीच संबंधित कलमान्वये एका तरुणीसह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता पाकिस्तानी ध्वज आला कसा आणि कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या याप्रकरणी अटकेनंतर पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत हर घर तिरंगा ही मोहिम राबविली जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाला घरोघरी तिरंगा फडकवता येणार आहे. त्यात कट्टर हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असलेल्या योगींच्या उत्तर प्रदेशमधून अशी घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.