श्रीपूर : माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या श्री पांडुरंग कारखान्यास देशपातळावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचे वितरण याच महिन्यात मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. Sripur’s Pandurang Karkhanyas National Level First Award Attendant Malshiras
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात पहिल्यांदा को-जनरेशन प्लँट उभारुन सहकारी साखर कारखान्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. को – जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीचा विचार करुन सन 2021-22 या वर्षाकरीता को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ६७ के.जी. बॉयलरच्या आतील को- जनरेशनसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.
या देशपातळावरील पुरस्काराचे वितरण शनिवारी ( दि. २७ ऑगस्ट) मुंबई येथे केंद्रीय मंत्री रस्ते, परिवहन तथा राजमार्गमंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
प्रशांतराव परिचारक यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया यांनी हंगाम २०१८—१९ ते २०२०—२१ या तीन वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर ६७ kg च्या आतील बॉयलर असणाऱ्या को-जनरेशन प्रकल्पास देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोकृष्ट पुरस्कार दिला आहे.
त्यामध्ये श्री पांडुरंग कारखान्याने कमीत कमी बगॅसमध्ये जास्तीत जास्त विज निर्मीती, अंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले कार्बन क्रेडीट, कमी उत्पादन खर्च, कारखान्यास मिळालेले ISO सर्टीफिकेट व कारखान्याच्या असलेल्या सुरक्षा योजना, कारखान्याचा सौर उर्जा प्रकल्प, कमीत कमी पाणी वापर ,पाण्याचा पुनर्वापर, पाचटाचा वापर करुन विज निर्मिती , को- जनरेशन प्लँटची क्षमता वापर या सर्व बाबीचा विचार करुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी जाणार असल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, श्री पांडुरंग कारखान्याचा ज्यावेळी को-जन प्लँट उभा केला त्यावेळी महाराष्ट्रात को-जनरेशन प्लँटचे प्रमाण कमी होते परंतू दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने व कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व संचालक मंडळाचे सहकार्याने कारखान्याचा को-जन प्लँट यशस्वी चालवला. त्यामधून जास्तीत जास्त विज निर्मिती करुन कारखान्यास आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
कारखान्याने को-जनरेशनमध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळेच कारखान्यास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडुन देशपातळीवरील सर्वोच्च को-जन प्लँट म्हणून गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे व संचालक यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी, कामगार यांचे अभिनंदन करुन पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
□ बेस्ट को-जन मॅनेजर पुरस्कार जाहीर
श्री पांडुरंग कारखान्याचे को-जन मॅनेजर सचिन विभुते यांना बेस्ट को-जन मॅनेजर पुरस्कार जाहीर झाला आहे. को-जन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा सन – २०२१—२२ या वर्षातील देशपातळीवरील बेस्ट को-जन मॅनेजर म्हणून पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण याचदिवशी 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सचिन विभुते हे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये मागील १८ वर्षापासून काम करीत असून त्यांनी केलेल्या कामगिरीच्या व त्यांनी दाखविलेल्या कौशल्याच्या जोरावर हा पुरस्कार प्राप्त झाला असून कारखान्यामध्ये उभारलेल्या को-जनरेशन प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे.