सांगली : राजकारणात करेक्ट कार्यक्रम राबवणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वेगळाच अंदाज आज स्वातंत्र्यदिनी पाहायला मिळाला. पाटील यांनी आज थेट लालपरीचं स्टेअरिंग हाती घेतलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष इस्लामपुरातील बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. खुद्द माजी मंत्री एसटी चालवत असल्याचं पाहून अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात त्यांना कैद केलं. Correct programme: Jayant Patal’s steering of Lalpari thanks to Eknath Shinde
आपली लालपरी दिमाखात सजली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्याना जोडणाऱ्या या लालपरीचे चालकाच्या मार्गदर्शनाने सारथ्य करण्याचा योग आला, अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. जयंत पाटील आज तहसील कार्यालय इस्लामपूर तसंच राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिले होते.
जयंत पाटलांनी लालपरीचे स्टेरिंग हातात घेऊन एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. यावेळी एसटी चालकांसोबत संवाद देखील साधला. इस्लामपूर आगारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांशी जयंत पाटलांनी संवाद साधला. त्यांच्याकडून असणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर एसटीचीही माहिती घेत थेट एसटी बस चालवली. ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटलांनी एसटीचे चालक म्हणून एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवली.
दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली होती. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जोरदार टीकेची झोड उठवली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार आणि आता खातेवाटप केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे किती जणांची मनं सांभाळतील. त्यामुळे नाराज असलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी मंत्र्यांच्या खातेवाटपावर दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सततच्या पावसामुळे टोमॅटोला धोका
सततच्या पावसामुळे टोमॅटोला धोका निर्माण झाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. टोमॅटोवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडे जळून जात आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
टोमॅटोवर तीन – तीन वेळा कीटकनाशक औषध फवारणी करूनही करपा रोग आटोक्यात येत नाही. बाजारभाव नसल्याने आधीच उत्पादन खर्चही निघत नसताना त्यातच फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. काही दिवसांपासून वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
सध्या ऊन पावसाचा खेळ आणि पावसाची अनियमितता टोमॅटोला धोका पोहचवत आहे. टोमॅटोवर मागील काही दिवसांपासून करपा रोग पडल्यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे.