Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

काटगावकर फसवणूक प्रकरण : 40 लाखाच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश

auction goods worth 40 lakhs and deposit the amount in court Solapur

Surajya Digital by Surajya Digital
August 16, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
काटगावकर फसवणूक प्रकरण : 40 लाखाच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश
0
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : काटगावकर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर यांच्या बांधकाम उपयोगी व गृहोपयोगी वस्तूच्या दुकानातील एकूण 40 लाखांच्या वस्तूच्या जाहीर लिलाव करून लिलावातून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी असा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी पारित केला. Katgaonkar fraud case: Order to auction goods worth 40 lakhs and deposit the amount in court Solapur

 

मे. हरिओम फायनान्स, मे रिध्दी सिध्दी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या फायनान्स व्दारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून 45 कोटी पेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायालयात सुरू आहे.

 

यातील मुख्य आरोपी शेखर काटगावकर याची इंद्रायणी इंटरप्रायझेस या नावाची गृहोपयोगी वस्तू तसेच रुद्र स्टील, रुद्र मशनरी व ईझी किचन हया नावाची बांधकाम वस्तु विक्रीची फर्म आहे. या सर्व फर्ममधील वस्तू या गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या रक्कमेतून घेतलेल्या असल्याने पोलिसांनी जप्त केलेल्या होत्या. त्या सर्व वस्तू जाहीर लिलावाव्दारे विक्री करून ती रक्कम न्यायालयात जमा करणेस परवानगी मिळावी, असा अर्ज विशेष सरकारी वकिल अँड.संतोष न्हावकर यांनी न्यायालयात दाखल केलेला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

त्यावर युक्तिवाद करताना संतोष न्हावकर यांनी गुंतवणुकदारांची गुंतवणूक संरक्षित होण्यासाठी सर्व वस्तुची विक्री करून ती रक्कम न्यायालयात जमा करणे ठेवीदारांच्या हिताचे आहे, असे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद मान्य करुन एकून 40 लाख किंमतीच्या सर्व वस्तू सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निकम व पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांनी परस्पर सहकार्याने व समन्वयाने जाहीर लिलावाव्दारे विक्री करून आलेली रक्कम न्यायालयात जमा करावी व तसा अहवाल लवकरात लवकर द्यावा, असा आदेश पारीत केला.

यात सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अँड. संतोष न्हावकर तर आरोपी तर्फे अँड. शशी कुलकर्णी हे काम पहात आहेत.

 

□ अंकोली येथे शेतकऱ्याने ड्रीपच्या पाईपने केली आत्महत्या

 

मोहोळ  : अज्ञात कारणावरून मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील ३७ वर्षीय शेतकऱ्याने ड्रिपच्या पाईप ने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी (ता. १५ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल डोके हे कुटुंबासमवेत अंकोली ता. मोहोळ येथे राहत होते. शेतीबरोबरच ते पिठाची गिरणी चालवून उदरनिर्वाह करत होते. १४ ऑगस्ट रोजी रात्री ९ : ३० वाजण्याच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर स्वप्निल यांनी कुटुंबातील सदस्यांना पिठाच्या गिरणीत जाऊन तेथून परत शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातो असे सांगून घरातून गेले.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी आले नसल्याने त्यांचे भाऊ सोहन डोके यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल बंद लागत होता. म्हणून त्यांनी शेतात जाऊन शोध घेतला असता शेतातील झाडाला ड्रीपच्या पाइपने गळफास घेऊन स्वप्निल अशोक डोके यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र गोरे करीत आहेत.

 

Tags: #Katgaonkar #fraud #case #Order #auction #goods #40lakhs #deposit #amount #court #Solapur#काटगावकर #फसवणूक #प्रकरण #40लाख #वस्तू #लिलाव #सोलापूर #न्यायालय #रक्कम #कोर्ट #जमा #आदेश
Previous Post

स्वातंत्र्य दिनी न्यायालय कोठडीतील आरोपीने केली मफलरने आत्महत्या

Next Post

शिंदे सरकारचे गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता मिळणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिंदे सरकारचे गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता मिळणार

शिंदे सरकारचे गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता मिळणार

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697