Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनी न्यायालय कोठडीतील आरोपीने केली मफलरने आत्महत्या

Accused committed suicide by muffler in court custody on Independence Day

Surajya Digital by Surajya Digital
August 16, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
स्वातंत्र्य दिनी न्यायालय कोठडीतील आरोपीने केली मफलरने आत्महत्या
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : मंगळवेढ्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने काल स्वा सोमवारी (ता. 15) मध्यरात्रीनंतर मफलरच्या साह्याने गळफास घेत आत्‍महत्‍या केल्याची माहिती मिळत आहे. Accused committed suicide by muffler in court custody on Independence Day

सुनील तानाजी किसवे (वय 21 रा शिरनांदगी ता. मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. पॉस्को कायद्या अंतर्गत दीड महिन्यापूर्वी सदर आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. येथील सबजेलमध्ये यापूर्वी आरोपी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत, तर आरोपी समवेत बोकड पार्टी केल्याच्या घटनेने देखील मंगळवेढ्याचे सबजेल राज्यात चर्चेत झाली होती. यात कारवाईही झालीय.

आता या आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा हे मंगळवेढ सबजेल चर्चेत आले आहे. काल रात्री उशिरा तर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरला पाठवण्यात आला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया होईल. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 तब्बल ११ ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेची कामगिरी

 

सोलापूर : भिवंडी, सोलापूर व ठाण्यातून तब्बल ११ ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विजयपूर येथून अटक केली. नंबरप्लेट बदलून त्या रिक्षांची विक्री केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी सलीम मेहबूबसाब मुल्ला व मुश्रीफ मकबुल नदाफ (दोघेही रा. विजयपूर, कर्नाटक) व मलंग बागवान (रा. केशवनगर, मौलाली चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील मलंग महमद बागवान हा या गुन्ह्यातील मास्टरमाइंड असल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे. मलंग हा स्वत: रिक्षाचालक आहे. त्याने दहा ऑटोरिक्षांची विक्री सलीम व मुश्रीफला केली होती.

 

दुचाकीसोबतच ऑटोरिक्षांची चोरी शहरात वाढल्याने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेला चोरट्यांचा शोध तत्काळ घेण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाने ऑटोरिक्षा चोरीचा अभ्यास केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली आणि १५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी विजयपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून ऑटोरिक्षा चोरीत सोलापुरातील मलंग हा सूत्रधार असल्याची बाब समोर आली.

ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार दिलीप भालशंकर, पोलिस नाईक योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, वसीम शेख, अमित रावडे, विजय वाळके, श्रीकांत पवार, राहुल तोगे, गणेश शिंदे, बापू काळे, सतीश कोटे यांच्या पथकाने केली. या तपासात सायबर सेलची मोठी मदत पोलिसांना झाली.

 

 

Tags: #Accused #committed #suicide #bymuffler #court #custody #Independence #Day#स्वातंत्र्य #दिनी #न्यायालय #कोठडी #आरोपी #मफलर #आत्महत्या
Previous Post

स्त्री आणि परावलंबित्व : पुरूषरूपी चाकाला महत्त्व, स्त्री रूपी चाकाचे अस्तित्वच दुर्लक्षित

Next Post

काटगावकर फसवणूक प्रकरण : 40 लाखाच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
काटगावकर फसवणूक प्रकरण : 40 लाखाच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश

काटगावकर फसवणूक प्रकरण : 40 लाखाच्या वस्तूंचा लिलाव करून रक्कम कोर्टात जमा करण्याचा आदेश

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697