□ नहीं चाहीये अच्छे दिन ; कोई लौटादो मेरे बीते हुए दिन !
सोलापूर : केंद्रातील भाजप सरकारच्या महागाई विरोधात सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महागाई’ची दहीहंडी फोडण्यात आली. तसेच मोदी सरकारच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन करून वाढत्या महागाईचा निषेध केला. NCP Youth Congress broke the ‘inflation’ bond; A striking movement against inflation
पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल, पालेभाज्या, दूध यासह खाण्याच्या तेलापासून ते वाहनाच्या तेलापर्यंतच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच डेअरी प्रॉडक्ट, दही, लस्सी, बटर यावर १८ जीएसटी लावून सरकारने सामान्य नागरिकांना आणखीनच महागाईच्या खाईत लोटले आहे. यूपीएचे सरकार असताना केवळ पाच रुपयांनी सिलेंडर महागला असताना भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी यूपीए सरकारला बांगड्या पाठवल्या होत्या. आता सिलेंडरच्या दराने हजाराचा आकडा गाठला असताना स्मृती इराणी आणि त्यांचे मोदी सरकार झोपा काढत आहे काय ? आता त्यांना कोणी बांगड्या द्यायच्या असा संतापजनक सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेले आंदोलन लक्षवेधी होते. एका मोठ्या दोरीला मध्यभागी निषेधाची हंडी बांधून त्यामध्ये सरकारचा निषेध करणारी छोटी कात्रणे टाकण्यात आली होती. तर हंडीच्या दोन्ही बाजूला तेल, पालेभाज्या, दूध ,धान्य तसेच गॅस यांचे प्रतीकात्मक पाऊच लटकवण्यात आले होते .
सामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या गाजरामुळे जनतेचे पोट भरत नाही, हे मोदींना दाखवून देण्यासाठी आज गोकुळाष्टमी दिवशी “महागाईची हंडी” फोडण्यात आली आहे. केंद्र सरकार देशभरातील जनतेच्या मुळावर उठले आहे. अगोदर महामारी आणि त्यानंतर आता महागाईचा सर्वाधिक मार जनतेला बसू लागला आहे. महिलांचे किचन बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. महागाई कमी केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाही. मोदी सरकारने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी यावेळी दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज गोकुळाष्टमी आहे. केंद्रात नरेंद्र मोदी जरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गोकुळाचा आनंद लुटत असले तरी देशभरातील जनता मात्र महागाईमुळे आनंदोत्सव साजरा करू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. देशात नुकताच आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. हे अभियान राबवत असतानाच घराघरात आलेली महागाई संपविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाऊल उचलले असते, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळाला असता.
परंतु या देशातील नागरिक आता पूर्णपणे महागाईला कंटाळून गेले आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. एकीकडे महागाई वाढत चालली असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर अनेक संकट उभी ठाकली आहेत. आतापर्यंत शेतीवरील संकटामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आता या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या आत्महत्या होण्याची मोदी सरकार वाट पाहत आहे काय ? असा संतापजनक सवालही उपस्थित केला.
नहीं चाहिये अच्छे दिन, कोई लौटादो मेरे बीते हुए दिन,
महंगाई की मार, जनता हो गई लाचार, महंगाई पर जनता के ‘मन की बात’, आजादी का अमृत महोत्सव, नव्हे महागाईचाच उत्सव, महागाईने महिलांचे किचन बजेट कोलमडले, पहले पराठा, अब आटा, हिरे पर कम ,स्याई पर GST जादा,मोदी नव्हे महागाई सरकार, असे फलक दिसून आले. एकूणच निषेधाची “हंडी” आणि महागाईने झाली “कोंडी” अशी या आंदोलनाची दिशा होती.
यावेळी प्रशांत बाबर, चेतन गायकवाड, विवेक फुटाणे, संपन्न दिवाकर, पिंटू जक्का,मुसा अत्तार,
विक्रात खुणे, तुषार जक्का, झहीर गोलंदाज, प्रशांत फाळके, राहुल काटे, विशाल कल्याणी, महेश पवार, कामले,मुझफ्फर बागवान,अजिंक्य उप्पीन,
इरफान शेख, अलमराजे आबादीराजे, सरफराज बागवान, विजय माने, सोहेल पटेल, उमर दलाल, सादिक कुरेशी, दीपक देवगुडे, तौकिर शेरी,
मुसा अत्तार, मयूर रच्चा, रोहन जाधव आदी उपस्थित होते.