अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी (ता. 18) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. पण गावक-यांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने धूम ठोकली. सैरावैरा धावत सुटलेल्या चोरट्याला विहिर दिसली नाही. त्यात पडून त्या चोरट्याचा जीव गेला. The thief ran away due to the fear of the villagers, accidentally fell into the well and died in Akkalkot.
चोरट्याने गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला
आणि घरातील रोख रक्कमेसह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. तात्काळ गावातील काही युवकांनी चोराचा पाठलाग सुरू केला. चोर हा युवक कार्यकर्त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी दिसेल त्या मार्गाने पळू लागला. या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली.
तात्काळ गावातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत चोरट्याचा त्या विहिरीतच जीव गेला. ही घटना कळताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे, उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान गावातील युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी दोन मोटारीच्या सहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यात आले, त्यानंतर जीवरक्षकाना बोलवण्यात आले. जीवरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे, महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.
दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. विहिरीजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर गावकरी ठाण मांडून होते. पोलीस प्रशासनाला मदतीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. दिवसभरात पोलीस प्रशासनाच्या मदतीला गावचे पोलीस पाटील, माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. काल शुक्रवारी (ता.19) रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूर : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर : सोलापुरात पोलीसाच्या दैनंदिन जीवनात एक दुःखद घटना घडलीय. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी एका हवालदार मृत्यु झाला आहे. या घटनेने पोलीस प्रशासनातून हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार अशोक लोखंडे (वय-५०) यांचे आज शुक्रवारी (दि.१९ ऑगस्ट) सकाळी अकस्मिक निधन झाले. अशोक नागनाथ लोखंडे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार अशा पदावर कर्तव्य बजावले होते.
सध्या आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. काल गुरूवारी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छाला उत्तर देत आणि आभार मानत ते आणि त्यांचे कुटुंब आनंदात असतानाच आज शुक्रवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्देवी ठरली.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून लोखंडे परिवाराचे सांत्वन केले.
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी लोखंडे कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलीस हवालदार अशोक लोखंडे यांनी अनेक चांगल्या कामगिरी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुरस्कार, बक्षिसही मिळाले होते. तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून त्यांचा सत्कारही झाला होता. अशोक लोखंडे प्रत्येकाला भेटल्यानंतर आनंदाने हसत बोलायचे. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून पोलीस आयुक्तालयात ही घटना समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
□ घरात घुसून विवाहितेचा विनयभंग एकावर गुन्हा
सोलापूर – आदल्या दिवशी झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून मारहाण करीत एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना अकलूज येथे १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.
या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी अविनाश सुहास गायकवाड (रा. इंदिरानगर घरकुल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश गायकवाड हा मंगळवारी (ता.16) दुपारी अकलूज परिसरातीत तक्रार देणाऱ्या महिलेच्या घराजवळ आला आणि एका तरुणास कोयत्याने मारहाण केली.
घरातील एका विवाहितेशी असभ्य वर्तन केले. तिचा पती भांडण सोडविण्यास आले असता त्याला देखील अविनाश गायकवाड यांनी ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत .