सोलापूर : कोरोना गेला म्हणता म्हणता परत सक्रिय होऊ लागला आहे. मंगळवेढा कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवेढा कारागृहातील दोन कैदी आजारी असल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात तपासणीला नेण्यात आले होते. कारागृहात ५१ कैदी आहेत. Three inmates of Mangalvedha Jail are infected with Corona, Police – Prisoners are scared
सोलापुरात तपासणीनंतर दोन पैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तपासणीत आढळून आले आहेत. दरम्यान जेलर, कैदी, पोलीस कर्मचारी यांची काल शनिवारी (दि. २१ ) कोरोना तपासणी करण्यात आली.
दरम्यान, कारागृहातील उर्वरीत ५१ कैद्यांची तपासणी केल्यानंतर दोन कैदी पॉझिटिव्ह असल्याने येथील कोरोना पॉझिटिव्ह कैद्याची संख्या आता तीन झाली असल्याचे जेलरकडून सांगण्यात आले. येथील दोन कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कैदी पॉझिटिव्ह आल्याने तेथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी व कैदी भयभीत झाले होते.
तपासणीवेळी जेलर सिताराम कोळी तसेच कैद्याना अन्नपुरवठा करणारे ठेकेदार, गार्डवर असलेले पोलीस कर्मचारी यांचीही तपासणी करण्यात आली. मात्र इतर सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने इतरजण सावरले. प्रत्येकजण अहवालावरून तणावात होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मरीआई पोलीस चौकी परिसरात चोरट्याने चार दुकाने फोडली
सोलापूर : मरीआई चौक येथील चार दुकाने फोडल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.१९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी राजकुमार सिद्राम जाधव (वय-३८,रा.सेटलमेंट कॉलनी नंबर ६) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर मंगळवेढा रोडवर असलेल्या मरीआई पोलीस चौकी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार दुकाने फोडली. बिअर शॉपी मधील पाच हजाराची रोकड घेऊन चोरटे लंपास झाले असुन ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपी चे कुलूप तोडून दुकानांमधील साडेपाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.तसेच दुकानाच्या शेजारी असलेले मल्लू बिज्जरगी यांचे कोल्ड्रिंक हाऊस अॅन्ड रसपान गृह तसेच मेहताब पटेल यांचे पटेल कोल्ड्रिंक्स अँन्ड रसपान गृह व सुहास सुग्रीव थिटे यांचे संकेत मेडिकल अँन्ड जनरल स्टोअर्स असे दुकाने फोडली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक डोके हे करीत आहेत.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मरीआई पोलीस चौक परिसरातील बिअर शॉपी,पटेल कोल्ड्रिक्स हाऊस आणि संकेत मेडिकल स्टोअर्ससह चार दुकाने फोडली. बिअर शॉपीमधील चोरट्यांच्या हाती पाच हजाराची रोकड लागली. परंतु इतर दुकानातून त्यांच्या हाती काही लागले नाही.
मेडिकल दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. ही घटना झाल्याचे कळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांचा तपास चालू असल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.