■ आ. सुभाष देशमुख यांची थेट अधिवेशनात तक्रार
सोलापूर : पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस चांगलाच गाजला. अनेक वादग्रस्त मुद्दे आज बुधवारी उपस्थित करण्यात आली आहेत. सोलापूर महावितरण कार्यालयात नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे केले जात असल्याची तक्रार आमदार सुभाष देशमुख यांनी केली. Complaint in the session: MLA Subhash Deshmukh showed obscene paperweight of a naked woman in Maha distribution office
आमदार सुभाष देशमुख यांनी संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी केली आहे.
संभाजीनगर मधील महावितरण अधीक्षक अभियंता प्रविण मारुतीराव दरोली या त्याच्या कार्यालयात नग्न महिलेचं चित्र काढलेलं पेपरवेट ठेवलं आहे. त्या ठिकाणी महिला अधिकारीही आहेत. महिला अधिकाऱ्याला वारंवार बोलावून हे पेपरवेट दाखवतो. तसेच या पेपरवेटवरून टिंगल करतो आणि अश्लील चाळे करतो, अशी तक्रारीचा मुद्दा अधिवेशनात आ. देशमुख यांनी मांडला.
तसेच, या महिलेने जानेवारी – फेब्रुवारीपासून हे चाळे सुरू असताना नाईलाजाने आता तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे” अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित तक्रारीची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना पुढील महिन्यापासून अनुदान, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज
मुंबई : अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये त्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून या मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेती व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या विविध निर्णयांची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. राज्यात कृषी कर्जाची नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना पुढील महिन्यापासून ५० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात येईल तसेच अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते.
मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या मुसळधार पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास, त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेत नियम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या प्रस्ताव ला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
विरोधी पक्षनेत्यांनी उत्तरावर दिलेल्या अंबादास दानवेंनी काही मुद्दे मांडले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी त्या सोडवण्यासाठी निर्णय देण्याचे आश्वासन दिले.
गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडींमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी
देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील, असे त्यांनी सांगितले.
□ पिक नुकसान भरपाईसाठी घोषणा
पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात तसेच कृषी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे, अशा ठिकाणी नुकसानीची सूचना आणि अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील, अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.
□ डिजिटल शेती अभियान
डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची ट्रेसेबिलिटी, ब्लॉक चेन मॉडेल, आर्टिफिशियल इन्टलिजन्स, को-ऑपरेटीव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांचे संगणकीकरण इत्यादी कार्ये हाती घेतली जातील. यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल.