सोलापूर : सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना आज न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुख यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयानं आज अंतरीम जामीन मंजूर केला आहे. Finally, High Court granted interim bail to Srikant Deshmukh
तक्रारदार महिला आणि श्रीकांत देशमुख हे एकमेकांशी अपरिचित नसल्याचं आणि ओळखीतून जवळीक वाढल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी श्रीकांत देशमुखनं सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आज जिल्हा न्यायालयात या अर्जावर न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयानं सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून देशमुख याचा अटकपुर्व जमीन फेटाळला.
देशमुखांना भाजपने तात्काळ राजीनामा देण्याचे फर्मान काढले होते. तसेच देशमुख यांनी देखील तात्काळ राजीनामा दिला होता. पीडित महिलेनं देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. विशेष या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांना जामीन मंजूर झाला नव्हता. पण उच्च न्यायालयानं आज अंतरीम जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार असल्याचे सांगितले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 24 ऑगस्टला जामीन अर्ज फेटाळला होता. आज श्रीकांत देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तक्रारदार महिला आणी श्रीकांत देशमुख हे एकमेकांशी अपरिचित नसल्याचं आणि ओळखीतून जवळीक वाढल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं, अशी माहिती श्रीकांत देशमुख यांचे वकील आशिष गायकवाड यांनी दिली.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. सोलापूर सत्र न्यायालयाने 24 ऑगस्टला जामीन अर्ज फेटाळला होता. पण न्यायालयाने उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती.
पुणे शहर पोलिसांत एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपचे नेते श्रीकांत देशमुख यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण सोलापूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. महिलेचा आणि देशमुख यांचा एक व्हिडिओ, ज्यामध्ये ती फसवणूक केल्याचा आरोप करताना दिसत होती. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
या घटनेनंतर पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून श्रीकांत देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. पीडीत महिलेने ती अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे सांगत होती. देशमुख याने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि त्या बहाण्याने सोलापूर, पुणे, मुंबई आणि सांगली येथे अनेकदा तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. त्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे.
□ महाराष्ट्र काँग्रेसला खिंडार?; संग्राम थोपटे फडणवीसांच्या भेटीला
मुंबई : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण त्यांनी आज शुक्रवारी (26 ऑगस्ट) सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. या भेटीमुळे कॉंग्रेसमध्ये देखील बंडखोरी होणार का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.