मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली. पक्षाचे नाव, चिन्ह या सहित आता एकनाथ शिंदे गट दसरा मेळावा देखील हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तशा हालचालींना वेग आलाय. Shinde government’s attempt to hijack Dussehra gathering with party name, symbol Thackeray Shivtirtha
शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी राजकीय वर्तुळासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख कोणती भूमिका घेणार आणि कोणावर हल्लाबोल करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आम्हीच खरी शिवसेना असल्याचे सांगणारे एकनाथ शिंदे गट दसरा मेळावा घेणार की शिवसेनेला परवानगी देणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी असा कोणताही आमचा प्रस्ताव नाही असे सांगितले असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली. शिंदे गटाने भाजपसोबत सरकार केल्यानंतर, एक एक करत शिवसेनेला उघडपणे आव्हान दिली. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत चर्चा सुरु होत्या. त्यावर त्यांनी भुमिका स्पष्ट केली. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अद्याप परवानगी मिळाली नाही.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली. पक्षाचे नाव, चिन्ह या सहित आता एकनाथ शिंदे गट दसरा मेळावा देखील हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करूनही दसरा मेळावा घेण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यामुळे एकनाथ शिंदे आता दसरा मेळावा देखील हायजॅक करणार आहेत, असेच चिन्ह दिसत आहेत. दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली ही परंपरा यंदा आता एकनाथ शिंदे चालवणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा घेण्यात आला नाही. मात्र आता कोरोना नसला तरी एकनाथ शिंदे किंवा मुंबई महापालिका दसरा मेळाव्याबाबत कारण ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच “दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.”, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलत असताना म्हणाल्या.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दसरा मेळावा शिवसेनेचाच असतो आणि शिवसेनेचाच राहणार, आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत. पण गद्दार सरकार दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे. या सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. पण शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होतो ही प्रथा आहे. जनता देखील बघत आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडून ही गद्दारी झाली आहे. हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार खोके सरकार पुढे नेत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.