मुंबई : शरद पवारांचे नातू व राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्या ग्रीन एकर या कंपनीतील घोटाळ्याची चौकशी ईडीने सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला मिळाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Large amount sent abroad, Rohit Pawar’s company ED probe Green Acre
रोहित पवार यांनी वृत्त वाहिनीला प्रतिक्रीया दिली. मला याबाबतची माहिती माध्यमातील वृत्तानंतर मिळाली. मी कागदपत्रं तपासून प्रतिक्रिया देईन, असे म्हटले.
11,400 कोटींच्या पीएनबी बँक घोटाळ्यात अटकेत असलेले राकेश वाधवान हे या कंपनीच्या संचालकपदी होते. रोहित पवार व राजेंद्र पवार हेही या कंपनीच्या संचालक पदी होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार ईडीकडे नोंदवण्यात आली आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याची बारकाईने तपास करणार आहे. ईडीला यात मनी लॉन्डरिंग तर झालं नाही ना याचा तपास करायचा आहे.
या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते.
तसेच, या कंपनीशी येस बँक-डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे माहिती आहे. मात्र, वाधवान बंधूंचे नाव येस बँक-डिएचएफएल घोटाळ्यात पुढे आल्यानंतर रोहित पवार यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर हळूहळू इतर चार सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यामुळे आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्या सोबतचे संबंध पाहता प्राथमिक तपासला सुरुवात केली आहे.
राजकीय सूडापोटी रोहित पवार यांचे नाव अडकवण्यात आलंय. ईडीचा वापर हा राजकीय विरोधाकांसाठी केला जात आहे. कारण नसताना रोहित पवारांचे नाव घेण्यात आले आहे. ते ग्रीन एकर कंपनीचे संचालक देखील नाहीत. महागाई, बेरोजगारीवर भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे नेते बोलत आहे त्यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले जात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलंय.
□ मुख्यमंत्री शिंदे अडकले ट्रॅफिक जाममध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याची घटना घडली आहे. पुण्यातील चांदणी चौकामध्ये कायम ट्रॅफिक जाम असते. यावेळी चक्क शिंदे यात अडकले. पुण्याच्या चांदणी चौकात ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं. गेल्या दोन वर्षांच्या कोंडीबाबतची माहिती दिली. तुमची तर अवघ्या पंधरा मिनिटांत सुटका झाली पण आमचं काय?, असा प्रश्न त्यांना विचारला. यानंतर शिंदेंनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
■ राष्ट्रवादीचे माजी आमदार झोपले रस्त्यावर
मुंबई गोवा महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळेच असे आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीने महामार्गावर खड्यांमध्ये गोट्या खेळण्याची स्पर्धा भरवली आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे थेट खड्ड्यातच झोपले होते. दरम्यान, ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता.. खातोय बोक्का’ अशी घोषणाबाजी यावेळी कदम यांनी केली.