सोलापूर : दीपक शेळके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनला जोरदार दे धक्का देत आपल्या गटाचे पदाधिकारी जाहीर केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडून नवे शिलेदार जाहीर करण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या, त्यांनी सोलापुरात येवून मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. परिणामी शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. मुख्यमंत्री गटाची ताकद वाढल्याने सोलापूरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाल्याचे चित्र आहे. Shiv Sena’s strength is divided, but ‘Shinde Group’ is becoming stronger in Solapur politics
शिवसेना नेमकी कोणाची? हा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोलापुरात देखील शिवसेनेमध्ये फूट पाडून शिवसेनेचे माजी विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड माजी शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशाचे फळ या पदाधिकाऱ्यांना मिळाले. अमोल शिंदे, मनीष काळजे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत समर्थक माजी शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले आणि तुकाराम मस्के यांच्यावर उपजिल्हाप्रमुखांची जबाबदारी दिली. माजी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यावर शहर प्रमुखपदाची धुरा दिली आहे.
वास्तविक पाहता हे शिवसेनेचे जुने शिलेदार आहेत. अनेक वर्षापासून हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रध्दा ठेवत आपल्या भागात शिवसेना वाढवली. सोलापुरात रूजवली. शिवसेनेची ताकद वाढवली. त्यामुळे त्यांची ज्या त्या भागात मोठी ताकद आहे. त्यांना मानणार मोठा समाज आहे. अमोल शिंदे दोन वेळा नगरसेवक झाले.
पालिकेचे विरोधीपक्ष नेतेपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. थोरला मंगळवेढा तरूण मंडळाच्या माध्यमातून शिंदे यांचे समाजिक कार्य मोठे आहे. त्याशिवाय त्यांनी तरूणाचे मोठे नेटवर्क तयार केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेचा गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्याचे फळ जिल्हाप्रमुखपद म्हणून मिळाले. या पदाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्की चमत्कार करतील, अशी अशा आहे तसेच उपजिल्हा प्रमुख असणारे हरिभाऊ चौगुले यांच्या घरण्याचा मोठा दबदबा आहे. शिवशक्ती उद्योग माध्यमातून समूहाच्या आपले मोठे जाळे निर्माण केले आहे. त्याशिवाय त्यांच्या सौभाग्यवती शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून पाच वर्ष चांगले काम केले आहे. त्याशिवाय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी त्यांचा जवळचा घरोबा आहे. हरिभाऊ चौगुले शहर प्रमुख असताना शिवसेनेच्या माध्यमातून वार्ड निहाय शंभर शिवसेना शाखा काढण्याचा संकल्प करत तो पूर्ण केला होता. वलयाचा फायदा एकनाथ शिंदे गटाला होण्याची शक्यता आहे.
शहर प्रमुख मनोज शेजवाल गेली चार टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. शेजवाल यांना मानणार मोठा वर्ग आहे. त्याशिवाय शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांच्या मागे देखील तरूणांची मोठी ताकद आहे. या सर्व गोष्टीचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
तर दुसरे उपजिल्हाप्रुख तुकाराम मस्के निष्ठावंत शिवसैनिक मानले जातात मात्र त्यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय केला असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र जिल्हाप्रमुखाची धुरा महेश कोठे यांच्या खांद्यावर आल्यानंतर कोठे यांनी मस्के यांना न्याय देत परिवहन सभापतीपदी विजयी करत सभापदीपदाची माळ त्यांच्या गळात टाकली.
तुकाराम मस्के ज्या भागात राहतात, त्या भागात मस्के यांचा चांगला दबदबा आहे. या वलयाचा फायदा एकनाथ शिंदे गटाला होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात घडणाऱ्या घडामोडी पाहता शिवसेनेची ताकत विभागली आहे. एकनाथ शिंदे गट बळकट होत राजकारणात सक्रीय होत असल्याचे पहायला मिळत आहे.