महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठा भूकंप झाला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या भिन्न विचारसरणीच्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी राजकीय युती केली असून आगामी सर्व निवडणुकाएकत्रितरीत्या लढवण्याचा निर्धारही केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधरबनबरे व शिवसेना नेते सुभाष देसाई या सर्वांनी प्रेस येऊन ही घोषणा केली. If such organizations are coming together, then whose is it? Shiv Sena Sambhaji Brigade alliance
केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. यालाच लोकशाही मानणारे लोक आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोक आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे, असे आपल्याला अनेकजण म्हणाले.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आल्याने मोठा इतिहास घडेल, असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कुणी कोणासोबत रहावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. शेवटी लोकशाही आहे ना? राजकारणात ज्यांच्यात आडवे विस्तव जात नाही. एकमेकांचे विचार पटत नाही, असे राजकीय पक्ष एकत्र आले तर हा प्रसंग राजकीय पंडितांसाठी एकप्रकारे भूकंपच ठरत असतो. संभाजी ब्रिगेड ही संघटना मराठा सेवा संघाचे अपत्य. मराठा समाजाची अस्मिता म्हणून या संघटनेची ओळख सांगितली गेली मात्र तिचा उपयोग राजकारणासाठी केला गेला.
शिवकालीन इतिहास ब्राह्मणांनी लिहिला. तो चुकीचा आहे, अशी तक्रार करून ब्रिगेडने एक मोहीम राबवली. ही मोहीम लोकशाहीला अभिप्रेत होती. परंतु पुढे ब्रिगेड चळवळीने वेगळेच वळण घेतले. श्रीसत्यनारायणाच्या पूजेला विरोध केला गेला. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली सरकारी कार्यालयातील देवांची आणि शाळांमधील श्रीसरस्वतींच्या प्रतिमा हटवण्याचे आंदोलन केले केले. पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटवर हल्ला केला गेला. स्टेडिअममधून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. इतकेच काय तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला काळिमा फासणारे कृत्य केले गेले, ते म्हणजे पुण्याच्या एका बागेतील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली गेली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापुरातील शिवस्मारकच्या शिल्पांची तोडफोड केली गेली. आज संघाची आणि ब्रिगेडची काय अवस्था झालीय ? त्यात काम केलेल्यांची जी अवस्था झाली आहे, ती पहावत नाही. तोडफोडीपेक्षा आपल्या पोटापाण्याची चिंता करायला हवी. समाजात बेरोजगारी आहे. गरिबांची उपासमार सुरू आहे. ब्रिगेडचा झेंडा गेल्यानंतर आपले भवितव्य काय? ही चिंता समोर दिसताच पदाधिकाऱ्यांना उपरती झाली आणि त्यांनी ब्रिगेडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
ब्रिगेडची ही विचारसरणी आणि कृती शिवसेनेला मान्य नव्हती. ब्रिगेडच्या विरोधात रस्त्यावर येण्याचा इशाराही शिवसेनेने वेळोवेळी दिलेला होता. तेव्हा अशा संघटना एकत्र येत असतील तर उतरंड कोणाची होत चाललीय ? यावर आता संशोधन करावे लागेल.
ब्रिगेडची भूमिका खुद मराठा समाजालाच नव्हतीच पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मागच्या दारातून ब्रिगेडला रसद पुरवली होती हे सत्य नाकारताच येणार नाही. इतिहास बदलवण्यात ब्रिगेडने मोठे योगदान दिल्याची प्रशंसा शरदरावांनी मध्यंतरी केली होती. तेव्हा ब्रिगेडला आशीर्वाद कुणाचा होता, हे त्यातून स्पष्ट होते. महाविकास आघाडी अभेद्य आहे, असे ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. तेव्हा ब्रिगेड शिवसेनेच्या आश्रयाला गेल्याची बाब शरदरावांना सहन होईल काय? हा खरा प्रश्न आहे.
ब्रिगेडला जवळ करून ठाकरे यांनी राष्ट्रवादीला शह दिला आहे काय? हाही प्रश्न पुढे यायला लागेल. राजकारणात सारेच पक्ष शब्द कसाही फिरवतात. प्रसंग व घटनांना कशीही कलाटणी देत असतात. असेच काहीसे चित्र या नव्या युतीतून समोर यायला लागेल. शिवसेनेसोबत गेलेली ब्रिगेड ही आमची नाही. आमची संघटना वेगळी आहे, असा दावाही केला जाऊ शकेल.
भाजपला शह म्हणून शिवसेनेने युतीसाठी हे नवे पाऊल टाकलेले असेल. ते समर्थनीय आहे पण ब्रिगेडची तोडफोडची भूमिका कायम राहिली तर ती शिवसेनेला मान्य राहील काय? याचे राज्याला स्पष्टीकरण हवे आहे. जर ही भूमिका सोडून ब्रिगेड नव्या प्रवाहात येणार असेल तर त्याचे स्वागत होईल. काळानुरूप बदल आवश्यक आहे. सर्वसमावेशक आणि समानता ठेवून राजकारण केल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हा आपल्या भारतीय राजकारणाचा सिद्धांत आहे.
📝 📝 📝