मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशीच्या दुष्परिणामांमुळे आपल्या डॉक्टर मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप असणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता त्यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारसह उद्योजक बिल गेट्स आणि सिरमचे अदार पूनावाला यांना नोटीस बजावली आहे. दिलीप लुनावत यांनी ही याचिका दाखल केली होती. तसेच नुकसान भरपाई म्हणून त्यांनी 1 हजार कोटी रूपयांची मागणी केली आहे. Doctor’s daughter dies due to corona vaccine; NOTICE TO COURT BILL GATES AND RESPECT
डॉ. स्नेहल लुनावत या नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यांनी कोविशिल्डची लस घेतली. कोविशिल्डची लस पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा काही दुष्परिणाम होत नाही, म्हणून डॉ. स्नेहलने कॉलेजमध्ये कोविशिल्ड लस घेतली होती.
लस घेतल्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली. अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. स्नेहलने 28 जानेवारी 2021 रोजी कोविशिल्ड लस घेतली होती. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी तिचे निधन झाले. याप्रकरणी डॉ. स्नेहल यांचे वडील दिलीप लुनावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आपल्या मुलीचा मृत्यू केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे झाली असल्याचा आरोप करत त्यांनी नुकसानभरपाई म्हणून सिरमने 1000 कोटींची रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि एम्स यांनी लशीचा दुष्परिणाम होत नसल्याचे सांगत चुकीची माहिती दिली. राज्य सरकारनेदेखील कोणतीही चाचणी न करता लस उपलब्ध केली. आपल्या दिवंगत मुलीला न्याय देण्यासाठी याचिका दाखल करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड व्हॅक्सीन घेतल्यानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला, बिल गेटस् आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
नुकसानभरपाई म्हणून सिरम इन्स्टिट्यूटने एक हजार कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. त्याशिवाय, गुगल, युट्यूब, मेटा सारख्या कंपन्यांनी लशीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे लपवून ठेवले. त्यामुळे त्यांच्यावरही केंद्राने कारवाई अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मित्तीसाठी बिल गेट्स फाऊंडेशनने आर्थिक साह्य केले असल्यामुळे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. न्या. गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे.