□ प्रत्येकी दहा हजार रुपये मिळणार
सोलापूर – कोरोनामुळे पालक गमावलेल्या सोलापुरातील बालकांना शैक्षणिक खर्च मिळणार आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. Solapur: The district administration will get educational expenses for the children who have lost their parents due to Corona
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई-वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. कोविडमुळे जिल्ह्यातील एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रूपये देण्यात येणार आहेत.
इच्छुक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी केले आहे. कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क आणि साहित्यासाठी 10 हजार रूपये शैक्षणिक खर्चासाठी वितरित करण्यात येणार आहेत.
पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला (झेरॉक्स प्रत), बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेचे पासबुक, बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आरोग्य सल्ला , शरिरातील प्लेटलेट्स
एकीकडे कडक ऊन अन् दुसरीकडे पावसाच्या सरी, अशा वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोलापूर शहर परिसरात संसर्गजन्य आजारांसोबतच डेंगी, मलेरियाचे रुग्णही वाढले आहेत.
साथीच्या आजारांमुळे शरिरातील प्लेटलेट्स कमी होता. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहेत. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. असे असलेतरी नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, या काळात सकर आहार घ्यावा. नारळ पाणी व व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि विश्रांती घ्यावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. तसेच या काळात विश्रांतीसोबत मनशांती आवश्यक असते. त्यासाठी योग, प्रणायम करण्याचा सल्ला दिला आहे.