मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठे वादळ आले असून सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. पक्ष, चिन्ह, वारसा याबरोबरच दसरा मेळावा कोण घेणार यावरून एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे समोरा-समोर उभे ठाकले आहेत. आता यात एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य करून खळबळ माजवली आहे. Shiv Sena – Dussehra gatherings have a strong relationship; So both the groups insisted on meeting
Shinde group
शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. शिवसेना आणि दसरा मेळाव्याचे एक घट्ट नाते आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी जो गट मेळावा घेईल तो गट कोर्टात पुरावा म्हणून वापर करतील म्हणूनच दोन्ही गट मेळाव्यासाठी आग्रही झाले आहेत.
दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. गणेश चतुर्थीनंतर दसऱ्याला शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबईतच राहावे, अशा सूचना आमदारांना एकनाथ शिंदेनी दिल्याची माहिती आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार का? असा प्रश्न विचारल्यावर दीपक केसरकर यांनी याबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेवूनच मगच निर्णय घेतलाय.
शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ते त्यांचे दिवास्वप्न आहे. आम्ही गुवाहाटीत असतानाही असे दावे वारंवार करण्यात आले होते. उलट गुवाहाटीतून मुंबईत आल्यावर आणखी एक आमदार आमच्या गटात सहभागी झाला, असा टोला शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. शिंदे गटातून आता एकही आमदार माघारी परतणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपले आहेत ते आमदार सांभाळावेत, नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आहे, ते उर्वरीत कधी जातील हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे चुकीची वक्तव्ये करू नका, असा सल्ला दिला. शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आहे. यामुळे राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अन्य कामांची अतिरिक्त जबाबदारी दिली जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करू, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरवर्षी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य सभेचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलं जातं. यंदा मात्र वातावरण वेगळं आहे. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बंडखोरी करण्यात आली आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेचा बंडखोर गटदेखील दसरा मेळाव्याबद्दल विविध दावे करताना दिसत आहे.
□ नवीन राजकीय खेळी ! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. शिंदेंनी दसऱ्याच्या वेळी सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचा सुचना दिल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज केला आहे.
□ दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची एंट्री
शिवसेना कुणाची याचा निर्णय कोर्टात होणार आहे. परंतू दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार याबाबत सध्या वाद सुरु आहे. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात हा वाद आहे. अशातच शिंदे गट राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याला आमंत्रित करण्याची तयारी सुरु आहे. शिंदे गट राज यांना दसरा मेळाव्याला आणणार असल्याची चर्चा आहे. अशातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
□ ‘उद्धव ठाकरे मराठ्यांचा द्वेष करतात’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलत असल्याचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. मराठा व्यक्ती मोठा झालेला त्यांना आवडत नाही, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत असेही रामदास कदम म्हणाले आहेत.