पंढरपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असणाऱ्या व्यास नारायण नगर मधील कै. मनोज दादा परचंडे मित्र मंडळाच्या वतीने 200 किलो गव्हापासून गणेश मूर्ती तयार केली आहे. विशेष म्हणजे विसर्जनानंतर या मूर्तीवरील गहू काढून हे मंडळ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी वाटणार आहे. Ganesha idol from 200 kg of wheat; Ganeshotsav Pandharpur Solapur will help the families of farmers
गणेशोत्सव हा वेगवेगळ्या माध्यमातून साजरा केला जातो पंढरपुरातही सध्या गणेशोत्सवाचा उत्साह दिसत आहे अशातच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ही व्यास नारायण नगर मध्ये तयार करण्यात आली. 200 किलो गव्हाचा वापर करून सात फुटाची आकर्षक व सुबक गणेश मूर्ती तयार झाली आहे.
महत्वाचे म्हणजे मंडळातील कार्यकर्त्यांनीच 26 दिवसाच्या परिश्रमातून ही गणेशमूर्ती तयार केली यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर या मूर्तीवरील गहू काढून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पेरणीसाठी देण्यात येण्याचा आदर्शवत निर्णय या मंडळांनी घेतला आहे त्यामुळे निश्चितच हे मंडळ आणि 200 किलो गव्हापासून तयार झालेली गणेश मूर्ती सध्या पंढरपूर मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पेरणीयोग्य गहू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देणार
पंढरपुरातील या गणेशमूर्तीसाठी वापरण्यात आलेले पेरणीयोग्य गहू विसर्जनानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहेत. तरुणांच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
पंढरपुरातील व्यास नारायणनगरमधील तरुणांनी यंदाच्या वर्षी तब्बल १० फुटी गणेशमूर्ती गव्हापासून बनवली आहे. याकरिता तेरा कार्यकर्त्यांनी तब्बल २६ दिवस मंडपातच मूर्ती बनविण्यांसाठी कार्य केले आहे. ही दहाफुटी गणेशमूर्ती बनविण्यासाठी २०० किलो उत्तम प्रतीचे दुबार पेरणीयोग्य गहू वापरण्यात आले.
मूर्ती केमिकलयुक्त रंगाऐवजी खाण्यायोग्य रंगाचा व साखरेचा वापर करण्यात आला आहे. गणेशमूर्तीच्या डोळ्यांसाठी साखरेचा वापर करण्यात आला असून, मूर्ती सुंदर व आकर्षक झाली आहे. उत्सवानंतर मूर्तीवरील सर्व गहू काढून पंढरपूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय व गरजू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
मंडळाने कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच सामाजिक उत्तरदायित्वाबरोबरच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून एक आगळावेगळा आदर्श सार्वजनिक मंडळासमोर ठेवला आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही केले आहे.
“पंढरपूर शहरवासीयांसाठी एक वेगळा उपक्रम सामाजिक दायित्वाबरोबरच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवली आहे. उत्सवाबरोबरच शेतकऱ्यांना छोटी मदत करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. दुबार पेरणीयोग्य धान्य असल्याने शेतकऱ्यांना व गरजूंना नक्कीच मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली”
– अमित माने, मंडळ अध्यक्ष