मुंबई : सायरस मिस्त्रींचे निधन झाल्याचे वृत्त आहे. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. पालघर पोलीसांनी मिडियाला ही माहिती दिली आहे. मुंबई- अहमदाबाद हायवेवर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अहमदाबादवरुन मुंबईकडे येत होते. तेव्हा त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. Former head of Tata group Cyrus Mistry passed away accidentally in Palghar
उद्योगपती सायरस मिस्री यांचा हा अपघात पालघर जिल्ह्यात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती पालघर पोलीस जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्रातील पालघर येथे हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचेही मोठे नुकसान झाले. तसेच कारमधील इतर लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2019 साली टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्ष आणि शापूरजी पालनजी समूहाचे वारसदार उद्योगपती – सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचे निधन झाले आहे. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचा चुराडा झाला आहे. मुंबई- अहमदाबाद हायवेवर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. ते 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले होते. सायरस मिस्त्री हे शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुपारी साडेतीनच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. यात मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता.
□ सायरस मिस्त्री कोण होते ?
– सायरस पालनजी मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले आहे. –
– त्यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला.
– ते 1887 साली स्थापन झालेल्या ‘टाटा सन्स’ ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते.
– टाटा सन्सचे 18 टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.
□ रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री झाले होते टाटा समूहाचे प्रमुख
– रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहाचा कार्यभार हाती घेतला.
– त्यांनी लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.
• सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी कंपनीमध्ये 1991 साली संचालक म्हणून दाखल झाले.
• सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे..