● अर्ध्या तासात फोटो लावण्याची दिली तंबी
हैदराबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या काल शनिवारी तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होत्या. तेव्हा रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने त्या एका जिल्हाधिकाऱ्यांवर भडकल्या. 35 रूपयांचा तांदूळ तुम्हाला 1 रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार 30 रुपये तर राज्य सरकार फक्त 4 रुपये खर्च देते. पण तेलंगणातल्या सरकारी रेशन दुकानांमध्ये मोदींचे फोटो लावत नाहीत, असे त्यांनी खडेबोल सुनावले. Union Finance Minister Nirmala Sitharaman was furious because there was no photo of Modi in the ration shop
Hyderabad
रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचे पाहून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चांगल्याच भडकल्या. पंतप्रधानांचा फोटो दुकानातून का गायब आहे, असा सवाल करत त्यांनी अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो दुकानात लावा, असे निर्देशच दिले.
भाजपच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या निर्मला सीतारमन यांनी रेशन दुकानात मोदींचा फोटो नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
निर्मला सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील एका रेशन दुकानात उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर सितारामण यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दुकानात का नाही?, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान, नाकापेक्षा मोती जड, अशी उपहासात्मक टीका अनेकदा विरोधक केंद्रावर करताना पहायला मिळतात. कामापेक्षा मोदी सरकार पब्लिसिटीवर जास्त खर्च करतं, असं काँग्रेस नेत्यांनी संसदेत टीका करताना म्हटलं होते. नरेंद्र मोदी यांच्या कोरोना लस प्रमाणपत्रावरचा फोटो असो किंवा खासगी कार्यालयात, अनेकदा फोटोवरून वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेशन दुकानमध्ये फोटो नसल्याने चांगल्याच भडकल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दुकानात का नाही?, याचं उत्तर जिल्हाधिकारी आणि अन्य उपस्थित अधिकाऱ्यांकडे नव्हतं. त्यामुळे अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्ध्या तासात फोटो लावण्याची तंबीच दिली. अर्थमंत्र्यांचं वक्तव्य पंतप्रधानांचा दर्जा खालावणारं आहे, हा सर्व प्रकार हास्यास्पद असल्याचं तेलंगना सरकारने म्हटलं आहे.