पुणे : भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीत येणार आहेत. त्यासाठी आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी आहे. मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार नाही, असे पडळकर म्हणाले आहेत. Sharad Pawar will have to flee like Sri Lankan leaders, Padalkar criticizes Baramati Pune
भाजपच्या ‘मिशन बारामती’ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मागील विधानसभा निवडणुकीवेळी मी बारामतीतून उभा होतो, त्यावेळी माझे डीपॉझिट जप्त झाले. आज मेळाव्याला मोठी गर्दी आहेत, ही माणसे त्यावेळी कुठे गेली होती, असा सवालही आ. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांना पळून जावं लागणार असल्याचा हल्लाबोल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एखाद्याला फसवून घ्यायचं लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या. निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणार देखील नसल्याचे पडळकर यांनी म्हटले.
या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना यांना सत्तेत बसू द्यायचं नव्हतं. तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दुःख असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
भारत- पाकिस्तान सामना जिंकल्यानंतर शरद पवार हात वर करतात. आता आरती करतानाचे व्हिडिओ त्यांना टाकावे लागतात, हेच भाजपचे यश आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडली, परंतु बावनकुळे ऊर्जामंत्री असताना शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मराठा ओबीसी आरक्षण आघाडी सरकारला देता आले नाही, परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर मिळाले, असे पडळकर यांनी यावेळी सांगितले.