Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूहृदयसम्राट; आता हे शिंदे गटाला कितपत रूचणार

Our Devendra Fadnavis, the emperor of Hindu hearts; Now how much Nitesh Rane Ahmednagar will interest the Shinde group

Surajya Digital by Surajya Digital
September 10, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूहृदयसम्राट; आता हे शिंदे गटाला कितपत रूचणार
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. आता ही उपाधी भाजप नेते नितेश राणे यांनी कौतुक करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वापरली आहे. त्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाची प्रतिक्रिया  ऐकणे महत्त्वाचे ठरणार आहे. Our Devendra Fadnavis, the emperor of Hindu hearts; Now how much Nitesh Rane Ahmednagar will interest the Shinde group

 

शिर्डी येथे आंदोलनात बोलताना नितीश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी वर टीकास्त्र सोडले आहे. अहमदनगर येथील श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते. भाषणात त्यांनी प्रशासनाला उघड धमकी दिलीय.

 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या तरुणाने मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याने त्याचे मुलीच्या कुटुंबियाने अपहरण केल्याचा आरोप आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.मात्र,अद्यापपर्यंत दीपकला शोधण्यात पोलिसांना यश मिळालं नाहीये.या विरोधात भाजप आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं.

 

महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे हिंदुहृदयसम्राट आहेत, असे विधान राणेंनी एका आंदोलनावेळी केले. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाचा गजर सुरू झाला आहे. आम्ही किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

जेव्हा पासून नवीन सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासूनच सरकारकडून हिंदुत्वाचा गजर करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नावावर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना नितीश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हिंदूह्रद्यसम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करण्यात आला.

 

नितीश राणे यांनी म्हटले, हे सरकार हिंदवी सरकार आहे आणि एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा पुढे हिंदुहृदयसम्राट लावलं जायचं पण आज शिर्डीमध्ये आंदोलनात बोलतांना नितीश राणे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. आंदोलनात बोलताना नितीश राणे यांनी अधिका-यांना खडसावले. जर कुठल्या हिंदू मुलावर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, हे सरकार हिंदुत्ववादी आहे. हे सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा. जर कोणी हिंदू मुलांकडे वाकड्या नजरेनी बघितले तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाही. आम्ही शांतपणे मोर्चा काढतोय. जर कोणी अंगावर आल तर त्याला आम्ही शिंगावर घेऊ असा हल्लाबोल केला.

नितेश राणे यांनी आमच्या माता भगिनींकडे कोणी वाकड्या नजरेनी बघितले तर त्याला जशास तसं उत्तर दिले जाईल, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मावळे आहोत आम्हाला हातात शस्त्र घेण्यास भाग पाडू नका, असे आवाहनदेखील केले.

□ शिंदे गटाला कितपत रूचणार

 

हिंदुहृदयसम्राट म्हणून दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. मात्र आता शिंदे यांनी अर्ध्यापेक्षा अधिक आमदार सोबत घेऊन वेगळी शिवसेना उभी केली आहे. तसेच त्यांनी भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले. मात्र आता मित्र पक्षाच्या नेत्यानेच देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे.

हे आता शिंदे गटाला कितपत रुचणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अद्याप शिवसेनेकडून यावर कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

□ प्रशासनाला उघड धमकी

 

महाराष्ट्राचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाहीये.आज नगर जिल्ह्याचा पालकमंत्री तो हसन मुश्रीफ नाहीये आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण नाहीये हे संबंधितांनी लक्षात ठेवावं.सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत जे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस काम करत आहे.त्यामुळे,अधिकाऱ्यांनी हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे लक्षात ठेऊनच काम करावं,अशी उघड धमकी भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला दिली आहे.

 

 

Tags: #DevendraFadnavis #emperor #Hinduhearts #NiteshRane #Ahmednagar #interest #Shindegroup#देवेंद्रफडणवीस #हिंदूहृदयसम्राट #शिंदेगट #कितपत #रूचणार #अहमदनगर #एकनाथशिंदे #नितेशराणे
Previous Post

‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार’ जाहीर; हे ठरले पुरस्काराचे मानकरी

Next Post

नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत; कामगार मंत्री सुरेश खाडेंचे पंढरपुरात वक्तव्य

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत; कामगार मंत्री सुरेश खाडेंचे पंढरपुरात वक्तव्य

नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत; कामगार मंत्री सुरेश खाडेंचे पंढरपुरात वक्तव्य

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697