सोलापूर : सतत पावसामुळे भिंत पूर्णपणे भिजली. पाण्याने भिजल्याने भिंत फुगून कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती पायावर भिंत कोसळून जखमी झाला आहे. A woman died in Solapur due to the collapse of a water tanker
सांगोला तालुक्यातील एखतपुत येथे ही दुर्दैवी घटना घडली. छबाबाई बबन पाटोळे (वय 54 ) या असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेचा आज शनिवारी ( दि. 10) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पाऊस पडनू भिंत फुगल्यामुळे अंगावर भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच त्यांचे पती बबन सिताराम पाटोळे (वय 60) हे पायावर भिंत पडल्यामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे उपचार चालू आहेत. या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली असून घटनेचा तपास सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी करीत आहेत.
□ पाण्यावर लोणी काढणा-या टोळीवर गुन्हा दाखल
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून सोलापूर शहरात पाणी टँकर पुरवठा केल्याच बनावट खेप दाखवून महानगरपालिके कडून अधिक रकमा घेतली असल्याने प्रकार समोर आला आहे.
याबाबत महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अविनाश वाघमारे (महानगरपालिका झोन अधिकारी) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तत्कालीन अधिकारी ए. व्ही भालेराव, तत्कालीन ज्युनिअर इंजिनिअर ए. पी सावस्कर, तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक कुमार अंबादास नंदा, निवृत्त कनिष्ठ लिपिक चंद्रकांत सिद्राम श्रीमंगले, शफी शेख, सोमनाथ शिवानंद साखरे, अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. जेलरोड पोलीस ठाणे येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सक्षम हजर राहून फिर्याद दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ चोरट्याने दागिन्यांसह रक्कम पळविली
सोलापूर : अज्ञात चोरट्याने सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.६ ) पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान अंबिका नगर अक्कलकोट रोड येथे घडली.
याप्रकरणी राजशेखर बसवराज कारंडे (वय-३५, रा. अंबिका नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी राजशेखर कारंडे यांच्या किचनच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर देवघरात असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून ६६ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
□ हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी पळवली
सोलापूर : अज्ञात चोरट्याने हॅण्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एम.एच.१३.सीएच.९८४४ ही चोरून नेली आहे. याप्रकरणी युन्नुस जाकीर हुसेन सुतार (वय-२५,रा. मु.पो .होटगी गाव) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोह. मुलाणी हे करित आहे.
□ मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी उघडकीस
सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी उघडकीस आणून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संभाजी शिवाजी भोसले (वय-२५,रा. मुळेगाव पारधी कॅम्प,सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी लक्ष्मी मुरलीधर शेजाळ (वय-७२, रा.नंदेश्वर तालुका मंगळवेढा) या नंदेश्वर येथे जाण्यासाठी सांगोला नाका येथे थांबलेली एका ओमीनी सारख्या चार चाकी गाडी जवळ घेऊन गाडी नंदेश्वरला जाणार आहे. गाडीत बसा असे फिर्यादी लक्ष्मी शेजाळ यांना बसवून गाडी नंदेश्वरला न घेऊन जाता गाडीतील चालकाने फिर्यादीच्या चाकू दाखवून सोने काढून दे अन्यथा तुला मारून टाकेल असे म्हणून अंगावरील सोने काढून घेतले. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी मंगळवेढा पोलिसांनी आरोपी भोसले याला ताब्यात घेत अटक करून कसुन चौकशी केली असता,त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,सोलापुर ग्रामीण,अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव,राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे,स.पो.नि बापुराव पिंगळे,पो.हे.कॉ.दयानंद हेबाडे,पोकॉ.वैभव घायाळ यांनी या गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि बापुराव पिंगळे, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.