उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्री यमाई मातेचं चरण स्पर्श बाजूलाच असलेल्या तीर्थातील पाण्याने घेतलं असून हा अदभुत दर्शनाचा क्षण पाहण्यास मिळाल्याची भावना भक्तगणातून व्यक्त केलं जातं आहे. Yamai’s feet were touched by the water of Kalola; Yog Mardi Uttar Solapur that came after 25 years
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील यमाईदेवी आहे. जागृत देवस्थान व श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या महाद्वारासमोर हेमाडपंथी व काळ्या दगडाने बांधण्यात आलेलं (बारव) कल्लोळतीर्थ आहे. दक्षिण व पूर्व दिशेला कल्लोळतीर्थात जाण्याकरिता २१ पायऱ्या आहेत. २५ ते २६ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात पडलेल्या पाउसाने कल्लोळ तीर्थ पाण्याने भरगच्च भरले आहे.
गेल्या चार – पाच दिवसापासून उत्तर तालुक्यात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. देवी मंदिराच्या महाद्वारासमोरील कल्लोळ तीर्थतील पश्चिम दिशेला अमृतेश्वर लिंगाचे मंदिर आहे. कल्लोळ तीर्थातील पाणी देवीच्या बाहेरील उत्तर बाजूस असणाऱ्या गायमुखीत भरपूर पाणी साचले आहे. देवीचे मंदीर व कल्लोळ तीर्थाची बांधणी ही जेव्हा अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस पडेल तेंव्हा पाणी आईच्या चरणी गायमुखातून येऊन देवीच्या चरणाजवळ साचेल, असे नियोजन करूनच बांधण्यात आले असल्याचे मुख्य विश्वस्त (ट्रस्टी) रंगनाथ गुरव यांनी सांगितले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मंदिरातील गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कल्लोळ तीर्थातील हे पाणी गायमुखी तीर्थातून पहाटेच्या सुमारास मंदिरात पोहचले. यापूर्वी १९९६ – ९७ मध्ये २५ ते २६ वर्षांपूर्वी कल्लोळातील पाणी गायमुखीमधून पाणी मंदिरात देवीच्या चरणी आले होते. त्यावेळी देखील हा अविस्मरणीय क्षण पहाण्यासाठी राज्य व परराज्यातून अनेक भक्त आले होते.
ही माहिती मुख्य विश्वस्त रंगनाथ गुरव, शहाजी पवार,अविनाश मार्तंडे, पुजारी निलेश गुरव, उदय गुरव स्थानिकानी दिली.आता देखील दोन तीन दिवसात कल्लोळातील पाणी मंदिरात आल्याने स्थानिक व सोलापूर जिल्हा परिसरातील भक्त पहाण्यासाठी गर्दी करत आहेत. मंदिरातील गाभाऱ्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी अहोरात्र विद्युत मोटारीच्या साहायाने पाणी काढण्यात येत आहे.
कल्लोळ तीर्थातील पाणी गायमुखी मधून २५ ते २६ वर्षांपूर्वी आईच्या चरणी आले होते. त्यावेळी लाखो भक्तांनी पाण्याला स्पर्श करून दर्शन घेतले होते. असा योग पुन्हा केव्हा दर्शनास मिळणार नसल्याने हजारो भक्त या क्षणाचा लाभ घेत आहेत. हा क्षण आपल्या हृदयात साठवून निरोप घेत आहेत.