मुंबई : कोरोना काळात जीवावर उदार होऊन महाराष्ट्रात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी गुडन्यूज आहे. अशाप्रकारे सेवा देणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिले आहेत. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Directives of the Shinde Govt
गेल्या अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, कोविड काळात वेगवेगळ्या विभागात कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार आहे. ज्यात नवीन भरती सुरु करताना या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामांचे अतिरिक्त मार्क देऊन प्राधान्य देण्यासाठी योजना आखली जात आहे, त्यामुळे कोविड काळात काम करणाऱ्यांना भरती प्रक्रियेत काही ना काही प्राधान्य मिळाले पाहिजे त्यासंदर्भातील कार्यवाही केली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आमदार निलेश लंकेंचा सन्मान
राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंकेंना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना काळात कोविड सेंटर चालवून कोविड रूग्णांसाठी भरीव योगदान दिले. हे नॅचरोपॅथी सेंटर होते. तेथे रूग्णांवर नैसर्गिक उपचार करण्यात आले होते. याची दखल घेत इंडिया बुक रेकॉर्ड्सने त्यांना सन्मानित केले आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
□ लम्पी आजारावरील लस मोफत मिळणार
मुंबई : लम्पी आजारामुळे राज्यातील 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 2 हजार 156 जनावरांना लम्पीची लागण झाल्याची पशुसंवर्धन खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यातील जळगाव, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने आता लम्पी आजारावरील सर्व लसी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.