□ आरपीआय, बाधित कुटुंबे व ग्रामस्थांकडून प्रशासनाचा निषेध
पंढरपूर : मोहोळ ते आळंदी महामार्ग क्र. 965 पालखी महामार्गमधील तुंगत (ता. पंढरपूर) येथील 12 कुटुंबे नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. बाधित कुटुंबांना नुकसानीच्या दुप्पट मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, बाधित कुटुंबे व ग्रामस्थांकडून तुंगत येथे रास्ता रोको करण्यात आला. Road stop in Tungat Pandharpur Tungat for Palkhi highway compensation
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील भीम नगर भागातील 12 दलित कुटुंबाची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मध्ये राहती घरे बाधित झाली आहेत. बाधित कुटुंबांना दुप्पट मोबदला देण्यात यावा यासाठी तत्कालीन प्रांत अधिकारी पंढरपूर यांनी भरपाई आदेश निवाडा एस.आर क्र. 65 / 2021, 30 एप्रिल 2022 रोजी प्रस्ताव पाठविला आहे. सध्याचे उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) नागेश पाटील जाणीवपूर्वक बाधित कुटुंबे दलित असल्याने त्रास देऊन दमदाटी करीत असल्याचा आरोप आंदोलकानी केला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन पंढरपूर भूसंपादन विभागाचे चांडोले यांनी स्वीकारले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे महा.राज्य संघटक सुनिल सर्वगोड, प. महा. सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, प.महा.बाळासाहेब कसबे, तालुका अध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, ता.सरचिटणीस दयानंद बाबर, ता.कार्याध्यक्ष सचिन भोसले, विजय वाघमारे, सचिव समाधान बाबर, सुरेश शिंदे, अरविंद कांबळे, वंशदीप शिंदे, भैय्या फडतरे, अमित कसबे, राजु शिंदे यांची उपस्थिती होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) नागेश पाटील हे जातीयवादी असून दलित कुटुंबांना न्याय देत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांकडून यावेळेस करण्यात आला. बाधित कुटुंबांना दुप्पट मोबदला दिला गेला नाही तर 27 सप्टेंबर 2022 रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बाधित कुटुंबाकडून देण्यात आला आहे.
यावेळेस सरपंच आगतराव रणदिवे, ग्रा.सदस्य अमित साळुंखे, औदुंबर गायकवाड, वामन वनसाळे, डॉ.पंकज लामकाने, डाॅ.योगेश रणदिवे, नवनाथ रणदिवे, सचिन गाडे, विजय खरे, सचिन भोरकडे, संदेश माने, अजिंक्य ओव्हाळ, योगेश जाधव, महेंद्र शिंदे, राजरत्न सरवदे, उत्तम फडतरे, बतास वनसाळे,अमर फडतरे, अविनाश वाघमारे, नितीन गायकवाड, निलेश वनसाळे बाधित कुटुंबे महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.