मुंबई : लम्पी आजारामुळे राज्यातील 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 2 हजार 156 जनावरांना लम्पीची लागण झाल्याची पशुसंवर्धन खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यातील जळगाव, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने आता लम्पी आजारावरील सर्व लसी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. Lumpy disease vaccine will be free, 57 thousand cows died in the country
राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातलं असून राज्यात आजपर्यंत २६६४ जनावरे संक्रमित झाले आहेत. राज्यातील ३३८ गावांमध्ये हे रुग्ण आढळले असून आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
सध्या लम्पी या आजारावरील १६ लाखाहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
लम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे. यासंदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे. प्राण्याची भूक कमी होणे, ताप येणे अंगावर सूज येणे या प्रकारच्या जर तुमच्या प्राण्याला असे काही लक्षण दिसत असतील तर लवकरात लवकर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. तसेच विभागाच्या आयुक्तालयातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर नंतर आता राज्यभर लंपी या आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळतंय. जळगावात देखील पशुंना लंपी आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ५६५ जनावरांना या आजाराची लागण झाली असली तरी ३६३ जनावरे या आजारातुन बरी झाली असून १७९ जनावरांवर उपचार सुरू आहे.
राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील यांनी मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीची मदत म्हणून १० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ही मदत देण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिली. तसेच नैसर्गिक आपत्तीबाबतही प्रस्ताव देण्यात आला आहे.
देशात अनेक राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
□ लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही
महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती त्यांनी दिली. लंपी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही.
त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लंपी फक्त गाय आणि बैलाला होतो. त्यामुळे सध्या राज्यात पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.