सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या महिला सरपंच जैतूनबी शेख (वय ६५ वर्ष) या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे फिर्याद मुलगा सरदार शेख यांनी दिली आहे. Woman sarpanch of Solapur missing, six days passed, accident without finding
बुधवारी (ता. ७ सप्टेंबर ) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारून येते असे सांगून शेतात गेल्या होत्या. मात्र शेळ्या परत आल्या पण ६५ वर्षीय महिला सरपंच जैतूनबी शेख या घरी परत आल्या नाही. कुटुंबातील दोन्ही मुलं, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी शोध घेतला. पण त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली.
शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने ग्रामस्थांनी जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रुक हे आपल्या फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. ज्या शेतात सरपंच भाभी शेळ्या राखायला गेल्या होत्या त्याठिकाणी जाऊन शोध सुरु केला. डॉग स्क्वाडला पाचारण केले. पण डॉग शेतात काही अंतरावर जाऊन घुटमळले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ वळसंग हद्दीत आराम बस उलटून एक ठार, सहा जखमी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात आज सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून अपघात झाला. यात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वळसंग पोलिसांनी दिली.
अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मो. नासिर शेख (वय 58, रा. गुलबर्गा) असे मयत चालकाचे नाव आहे. लिंगम्मा मल्लम्मा पुजारी (वय 54, रायचूर, कर्नाटक), रुकमा शेख (वय 77, मुंबई), अमरीश कोडी (वय 37, गुलबर्गा) सतीश कुमार (वय 39, यादगिर), राजाराम कष्टे (वय 65 आळंद, कर्नाटक), अनिल राठोड (वय 22, शहापूर, यादगिर) असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. बसमधील जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने अपघात झाला. याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.