सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात आज सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून अपघात झाला. यात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वळसंग पोलिसांनी दिली. One killed, six injured after Aram bus overturns in Valsang area, Akkalkot road, Solapur
अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मो. नासिर शेख (वय 58, रा. गुलबर्गा) असे मयत चालकाचे नाव आहे. लिंगम्मा मल्लम्मा पुजारी (वय 54, रायचूर, कर्नाटक), रुकमा शेख (वय 77, मुंबई), अमरीश कोडी (वय 37, गुलबर्गा) सतीश कुमार (वय 39, यादगिर), राजाराम कष्टे (वय 65 आळंद, कर्नाटक), अनिल राठोड (वय 22, शहापूर, यादगिर) असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. बसमधील जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने अपघात झाला. याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ तेजस कांबळे याच्यावर तडीपारीची कारवाई