मुंबई : खरी शिवसेना शिंदे गटाचीच आहे आणि धनुष्यबाणही त्यांचाच आहे, हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणारच, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. प्रभादेवीतील राड्यानंतर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची आज राणे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे समर्थकांना इशारा दिला आहे. सरवणकर आमचे सहकारी आहेत, आमची ताकद त्यांच्यासोबत आहे, ठाकरे समर्थकांनी सरवणकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे ते म्हणाले. Real Shiv Sena belongs to Shinde and will get bow and arrow – Narayan Rane Sada Saravankar
नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मातोश्रीच्या दुकानात तक्रारींच मार्केंटिंग सुरु आहे. दसरा सोहळा खरी शिवसेना शिंदेगट हेच करतील, शिंदे गटाची ताकद आम्हाला कळली आहे.मी आमदार सदा सरवणकर यांची भेट घ्यायला आलो आहे. सरवणकर आणि यांना मारण्यासाठी ५० जण धावले होते. या प्रकरणाची चौकशी पोलीस करतील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिंदे गटाची ताकद काय वेळ आहे ते काळानुसार कळेल, ठाकरे गटाच्या या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. दखल घेतली तरी यांचं चालणं, बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं आहे हे लक्षात ठेवा, असले प्रकार चालू देणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात तुफान राडा झाला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा उद्धव ठाकरे गटातील हेमांगी वरळीकर यांच्या गटासोबत वाद झाला, यात सदा सरवणकर यांनी शिवसैनिकांना धमकवण्यासाठी पिस्तूलतून हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकरांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकरांची राहत्या घरी भेट घेतली.
या घटनेनंतर अद्याप सरवणकर गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेना आणि सदा सरवणकर यांच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एंन्ट्री झाल्याने या वादाला कोणते वळण मिळणार यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
□ नारायण राणे पत्रकारांवर भडकले, म्हणाले…
नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सरवणकरांनी केलेल्या कथित गोळीबारावर प्रश्न विचारला. त्यावर नारायण राणे भडकले. “गोळीबार केल्याचा तुमच्याकडे आरोप आहे का? चौकशी सुरू आहे, असे विचारा. अन्यथा मी आता तुमच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगेन,” असे ते म्हणाले. भाजपा-शिंदे गटाची सत्ता आहे. पोलिसांनीही त्याची खबर घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.