अहमदनगर : महागाई गगनाला भिडली आहे पण नोकऱ्या मात्र नाही याचा फायदा घेत मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांना फसवणाऱ्या ठगांना पोलिसांनी गजाआड केल्यानंतर यामध्ये मोठ्या टोळीचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.Sairat fame Prince Dada likely to be arrested on fraud charges Ahmednagar
या प्रकरणी आतापर्यंत राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ‘टोळीत प्रसिद्ध चित्रपट सैराटमधील प्रिन्स अर्थात सूरज पवार देखील सामील असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी दिली आहे.
अभिनेता सुरज पवार याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून कामासाठी शिक्के लागत असल्याचं सांगितले आणि आरोपींनी भारताच्या बनावट राजमुद्रा तयार करुन त्याचा गैरवापर केला आहे. या प्रकरणात सूरजला देखील अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संशयित आरोपींनी सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात नोकरीला असल्याचं महेश वाघडकर या तरुणाला सांगितलं होतं. यासाठी सुरज पवार याने संगमनेरमधून बनावट शिक्के बनवले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात अभिनेता सुरज पवारचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे. महेश वाघडकर याने दाखल केलेल्या तक्रारीवरुन फसवणूक करणं, बनावट शिक्के आणि दस्तऐवेज तयार करणं या कलमान्वये संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता सुरज पवारने सैराट चित्रपटात आर्चीच्या भावाची म्हणजेच प्रिन्स बाबाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या या डॅशिंग भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याचबरोबर त्याला या भूमिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मात्र सध्या सुरज पवार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका फसवणुकीच्या प्रकरणात सुरज पवारचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय क्षिरसागर, आकाश शिंदे, ओमकार तरटे अशी या तिघांची नावे आहेत. दत्तात्रय हा नाशिकचा रहिवाशी आहे. तसेच, आकाश आणि ओमकार हे दोघेही संगमनेरचे रहिवाशी असल्याची माहिती मिळते. या टोळकीने मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाख रूपयांची मागणी केल्याचे समजते. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता, या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.