सोलापूर : शिट्टी वाजवून महिलेची छेडछाड काढणे महागात पडले. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी अपिलात कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.तसेच आरोपीने १५ हजार रुपये फिर्यादी हिला देण्याचा आदेश पारीत केलेला आहे. Harassment of woman by whistling; Punishment Solapur till court with monetary penalty
कुंदन बाळू सुरवसे (वय-३३, रा.खेड, ता. उ. सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात सविस्तर हकिकत अशी की, दि.५ मार्च २०१३ रोजी पिडीत महिला व तिची बहिण शिवण क्लासला जात असताना आरोपी हा खेड पाटीजवळ उभा होता व त्याने पिडीतेला पाहून शिट्टी वाजवली. तु माझ्या बरोबर येतीस काय असे शब्द बोलल्यानंतर फिर्यादीने घरी येवून वडील व भावाला घटना सांगितली.
या हकिकतीवरुन सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता. खटल्याची सुनावणी होवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांनी आरोपीस दोषी धरुन शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरुध्द आरोपीने अपील दाखल केले होते. त्या अपीलाकामी आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली व आरोपीने १५ हजार रुपये फिर्यादी हिला देण्याचा आदेश न्यायालयाने पारीत केला आहे.
या प्रकरणात सरकारपक्षाच्या वतीने अति.सरकारी वकील ॲड. ए.जी.कुलकर्णी यांनी काम पाहिले.तर आरोपीच्या वतीने ॲड.व्ही.पी.शिंदे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ खुनी हल्ला प्रकरणी ; आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी
सोलापूर : शिवीगाळ करून खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल गफूर शेख यास जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षाची सक्त मजुरी ची शिक्षा ठोठावली.
या घटनेच्या हकीकत अशी की, दि.१ सप्टेंबर १७ रोजी रात्री साडेनऊ वाजण्या सुमारास गौस शेख यांच्या कॅन्टीनवर फिर्यादी व त्याचा लहान भाऊ बोलत उभे असताना आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल गफार शेख (रा.विडी घरकुल,कुंभारी) हा शिवीगाळ करत होता. त्याचा जाब विचारलेच्या कारणावरून चिडून जाऊन त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या चाकूने फिर्यादी व त्याचा लहान भाऊ शाहनवाज या दोघांवर जीवे मारण्याच्या दृष्टीने चाकू हल्ला केला.
या हल्ल्यात डोक्यात,तोंडावर सपासप वार झाल्याने जखमी झाले. या प्रकरणात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस खुनी हल्ला, शिवीगाळ व दमदाटी या अपराधाखाली दोषी धरून ७ वर्षाची सक्त मजुरी,२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ॲड.ए.जी कुलकर्णी. ॲड.डी.एम पवार, ॲड. शितल डोके, ॲड.जी.आय रामपुरे यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड.ए.एम शेख यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास सा.ह.पो.नि.एम.एस. भावीकट्टी यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून शितल साळवे यांनी काम पाहिले.