》आरोपांची नॉनस्टाप एक्सप्रेस
■ बार्शीतील उद्योग-व्यवसाय वाढीला दिले नाही प्रोत्साहन
■ या शहरातील २२ दाळ मील बंद पडण्याला निष्क्रीय नेतृत्व कारणीभूत
■ बाजार समित्यांमधील सेस केवळ २ ते ४ कोटींपर्यंत
■ बिचाऱ्या शेतकऱ्यांचे २१ कोटी रूपये बुडविण्याला कारणीभूत
सोलापूर / शिवाजी भोसले : ‘बार्शी तिथं सरशी’ अशी प्रत्येक आघाड्यांवर गत असलेल्या या तालुक्यातला राजकीय जलवा तसा उभ्या महाराष्ट्राला परिचित. पण नेहमीच राजकीय गरमी असलेल्या हॉट बार्शीत आता वेगळंचं ओपन चलेंज दिलं गेलंय. ‘Hot’ Barshi Open Challenge Nava ‘Jalwa Re Jalwa’ , Rajendra Raut Dilip Sopal Rajkaran
भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार दिलीप सोपल यांच्यातील राजकारणाचा जलवा, कडवी झुंज ही प्रसिध्द एकमेकांना पुरुन उरलेल्या राऊत आणि सोपल या दोघांनी आजवर या तालुक्याच्या राजकारणात एकमेकांना कडवं आव्हान दिलेला इतिहास आहे. पण नेहमीच राजकीय गरमी असलेल्या हॉट बार्शीत आता वेगळंचं ओपन चलेंज दिलं गेलंय. विशेषत्वे, हे चलेंज दिलंय, ते आमदार राजेंद्र राऊत यांनी. चलेंज देताना राऊतांनी वापरलेले जे शब्द प्रयोग आहेत, ते अक्षरश: जहरी आहेत. यापूर्वी आव्हान देताना त्यांनी बहुधा हे शब्द प्रयोग वापरले नसावेत. कडव्या संघर्षाचा ठासून साठा भरलेल्या राऊतांच्या भात्यातून जे बाण निघालेत, ते आग ही आग असे काही औरच.
संजय राऊत यांनी दिलेल्या नव्या आव्हानांचा सोपलांनी स्वीकार केल्यास बार्शी तालुक्यातील बिचाऱ्या शेतकऱ्यांचं कल्याण होवू शकतं. आजवर राजकीय पटलावरील राऊतांचं प्रत्येक तगडं आव्हान स्विकारणारे आनंदयात्री सोपल हे आव्हान आनंदाने स्विकारणार का ? राऊतांनी सोडलेले आव्हानांची ‘आग ही आग’ बाण परतवून लावतील का? या संदर्भातील औत्सुक्य आता या तालुक्यात सर्वच पक्षातील संबंधितांना, त्याशिवाय राऊत -सोपल समर्थकांना आहे.
आव्हान स्विकारण्यावरून बार्शीत म्हणे आता काही जणांच्या पैजाही लागल्याची चर्चा आहे. राऊत परिवार करत असलेला कोणताही व्यवसाय सोपल परिवारांनं करून दाखवावा, हेच ते राऊतांनी दिलेले ओपन चलेंज, सोपल परिवारानं आव्हान स्विकारून, समजा या परिवारानं व्यवसाय केले, त्यात जेवढा भाव सोपल देतील, त्यापेक्षा ५० रूपयांनी राऊत यांचा भाव जादा असेल. आव्हान स्विकारून व्यावसाय करताना, शेतकऱ्यांचा फायदा आम्ही बघू, फायदा – तोट्याचा विचार करणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● चढाईत राऊतांची सरशी, सोपलांची गोची
सोपल अन राऊत हे कट्टर राजकीय दुष्मन. राजकीय दुष्मनीतून एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोघांनी एकमेकांना खिंडीत तसेच बोळीत गाठण्याची एकही संधी सोडली नाही. यामध्ये कधी सोपल तर कधी राऊतांची सरशी झाली. मात्र कारखाना प्रकरणाशी संबंध असलेल्या २१ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात प्रकरणात सोपलांवर चढाई करताना राऊत उजवे ठरल्याचं मानण्यात येतंय.
कारण २१ कोटी रूपये १५ दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याकडे भरावे लागणार आहेत. एक रकमी तब्बल २१ कोटी भरणं म्हणजे दिवसा चांदण्या दिसण्यासारखं भव्य आहे. यातून सोपल हे खिंडीत सापडले गेलेत असं मानण्यात येतय.
● उद्योगाची अगली मंझिल
बार्शी शहरातील उद्योग व्यवसायासंदर्भात सोपल यांच्यावर चौफेर जहरी टिकेचे बाण सोडताना आमदार राजेंद्र – राऊत यांनी राऊत परिवाराच्या सगळ्याच उद्योग धंद्यांची कुंडली सांगतानाच जामगाव या ठिकाणी आपले सुपुत्र प्रकल्प उभारणार आहेत, याशिवाय दाळ मिल प्रकल्पदेखील सुरु होत आहे, हे सांगितले. त्याशिवाय आपले दोन मित्र प्रकल्प साकारात आहेत. त्यांना आपण सहकार्य करीत आहोत हेदेखील ते म्हणाले.
● राऊतांचा डब्बल उखळी बॉम्ब
घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचे २१ कोटी रूपये बुडविण्याच्या मुद्यांवरून राऊत हे सोपल यांची जंत्री काढत आहे. या परिवाराने कोणाच्या जागा आणि जमिनी कशा बळावल्या हे नावासह सांगत आहेत, शेतकऱ्यांचे २१ कोटी द्यावेत, सोपल परिवाराने एक रूपयादेखील कोणाचा बुडवू नये, आपण कोणाचा एक छदाम कधी बुडवला नाही.
बँकेचे खाते कधी थकबाकीत जावू दिले नाही. विट भट्टीसाठी पाच लाख कर्ज काढण्यापासून कर्ज घेण्याला सुरुवात केली. सगळी कर्जे व्यवस्थित भरली जात आहेत. सोपलांनी आपल्यासारखे उद्योग काढावेत, त्यांना पत्रकारांमार्फत आपलं ओपन चलेंज आहे. राऊतसोबत आव्हान स्विकारून यावं पटांगणात राऊतांशी खेळ खेळायला, असा इशाराही त्यांनी आव्हान देताना दिला आहे. इतकेच काय सोपल परिवारातील नशाबाजी संदर्भातदेखील राऊतांनी पंचनामा केला.