□ 50 जणांची नाव चर्चेत, मिळणार कोणाला
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ऑगस्ट महिन्यात विस्तार झाला होता. आता दुसऱ्या मंत्रीमंडळाचा दसऱ्याच्या मुहुर्तावर विस्तार होणार अशी माहिती मिळत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही नेते नाराज झाले होते. या नेत्यांना आता संधी मिळू शकते. It is time to expand the cabinet, the ministerial lottery will be held before Diwali
दिवाळीआधीच मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं. काही दिवसापूर्वी या नव्या सरकारचा दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. आता दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र अशातच शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असं वृत्त काही वृत्तवाहिनीने दिले आहे. पितृपक्ष आल्यामुळे विस्तार रखडला होता. महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची शक्यता होती. पण, आता विस्ताराला ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे, तसंच पालकमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे रखडली आहे. त्यामुळे दुसऱ्या विस्ताराकडे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छुक मंत्री बाशिंग बांधून सज्ज आहे. पण पितृपक्ष आल्यामुळे विस्तार रखडला होता. महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची शक्यता होती. पण, आता विस्ताराला ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिवाळीच मंत्रिपदाचे गिफ्ट मिळणार अशी चिन्ह आहे शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
□ 50 जणांची नाव चर्चेत
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.