कुर्डूवाडी / हर्षल बागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातलं कोणतंही आंदोलन असो की कोणताही दिलेला कार्यक्रम असो ते कुर्डूवाडीत नित्यनियमाने कधीच झाले नाही. मात्र आता मोठे साहेब येणार म्हटले की, कधीही न दिसणारे चेहरे आता पोस्टरवर झळकत आहेत. कुर्डूवाडीमध्ये हा चर्चेचा विषय होत आहे. Sharad Pawar’s entry: Kurduvadi appeared on the poster of the never-seen city president Dattaji Kaka
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा कुर्डूवाडीत नावापुरताच … शहरात अनेक अध्यक्ष झाले… नेते झाले… पण कुर्डूवाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता पवारांच्या आदेशावर एकही मोठे आंदोलन करू शकला नाही. सत्ता काळात असताना अनेकांनी तिथे जाऊन लाभ घेतला पण सत्तेबाहेर असताना पवारांच्या सांगण्यावरून राज्यभरात आंदोलन झाली पण कुर्डूवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना अद्याप आंदोलनाची जागाच मिळाली नाही, असेच म्हटले जात होते.
शरद पवार हे स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाला उद्या सोलापुरात येत आहेत, असे कळताच कुर्डूवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताजी काकडे यांनी बॅनर छापून शहरात पक्ष किती मोठा आहे हे दाखवण्याचा केलेला एक केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शहरात दोन-तीन जागी लावलेले डिजिटल खरे पण त्या डिजिटलवर शहराध्यक्ष वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुर्डूवाडी शहरातील एकाही पदाधिकाऱ्याचा फोटो नाही, एरवी राष्ट्रवादीचा एकही कार्यक्रम न घेणारे दत्ताजी काकडे हे आता मात्र पवारांच्या एन्ट्रीमुळे बॅनरवर झळकू लागले आहेत. कुर्डूवाडीमध्ये हा चर्चेचा विषय होत आहे.
खरंतर दत्ताजी काकडे यांचा प्रवास माढा तालुका वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष इथपासून चालू झाला आणि संजय मामांच्या कृपेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादीची शहराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली. दुर्दैवाने दत्ताजी काकडे हे मामांच्या या निर्णयाला सार्थकी ठरू शकले नाहीत हेही तितकेच खरे. ‘मै और मेरे ट्रक’ हा एवढाच त्यांचा आता चाललेला प्रवास… फक्त शरद पवारांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीचा अस्तित्व शहरात दिसावं मी शहराचा अध्यक्ष आहे हे लोकांना कळावं, म्हणून मुख्य चौकात बॅनरबाजीचा केलेला हा इव्हेंटच म्हणावा लागेल.
● फक्त बॅनरबाजीपुरते शहराध्यक्ष
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे व पक्षाचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर असलेल्या दत्ताजी काकडे यांना भरभरून दिले पण याची उत्तराई मात्र दत्ताजी काकडे यांच्याकडून अद्याप झालेली दिसून येत नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात व दादा – मामांच्या ही कोणत्याही नियोजनात म्हणावा असा सक्रिय सहभाग दत्ताजी काकडे यांनी कधीच घेतला नाही. केवळ आपल्याकडे राष्ट्रवादीचे पद आहे हे दाखवण्यासाठी केलेली ही बॅनरबाजी, अशी चर्चा कुर्डूवाडीतल्या चौकात चौकात होत आहे.